आगामी विधानसभा निवडणूक तयारी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निवडणूक यंत्रणेचा आढावा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4:- आगामी विधानसभा निवडणूक 2019 तयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज जिल्हा निवडणूक यंत्रणेतील सहायक निवडणूक अधिकारी तसेच विविध समिती प्रमुखांच्या कामकाजाचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्यश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी निवडणूक वैशाली माने, उपजिल्हाधिकारी रोहयो रविंद्र मठपती, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उपजिल्हाधिकारी भूसंपादन मेट्रोसेंटर-1 पनवेल, जयराम देशपांडे, उपजिल्हाधिकारी भूसंपादन मेट्रो सेंटर-1 उरण अश्विनी पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पाडूरंग शेळके,  आदी सर्व अधिकारी, तहसिलदार व निवडणूक यंत्रणेतील नोडल अधिकारी उपस्थित होते.
 यावेळी मतदार यादी अद्यावतीकरण, तसेच निवडणूक पूर्वतयारी व ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्राबाबत केली जात असलेली जनजागृती याबाबत आढावा घेण्यात आला. निवडणूक विषयक कामे यंत्रणेने दक्षता ठेवून व विहित कालमर्यादेत पूर्ण करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी दिले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक