रायगड जिल्हा मानसेवी होमगार्ड सदस्य नोंदणी ऑनलाईन फॉर्म भरण्यास 10 सप्टेंबर पर्यंत अंतिम मुदत




अलिबाग दि.04 सप्टेंबर :-  रायगड जिल्हा होमगार्ड अंतर्गत पथक,उपपथका मधील पुरुष, महिला होमगार्ड सदस्य नोंदणी दि.16 व 17 सप्टेंबर 2019 रोजी रायगड जिल्हा पोलीस मुख्यालय, अलिबाग येथे सकाळी 7.00 पासून घेण्यात येणार आहे.
नोंदणीसाठी इच्छुक उमेदवारांनी दि.10 सप्टेंबर पर्यंत (https://dnyanjyotisatara.in/hgmaha/login1php) या संकेत स्थळावर जाऊन HGS ENROLLMENT मधील ONLINE ENROLLMENT FORM  मध्ये ऑनलाईन फॉर्म भरावे.  Print Registration Form  मध्ये जाऊन फॉर्मची प्रिंट काढून सदरची प्रिंट मूळ कागदपत्रांसह व त्यांच्या छायांकित प्रतिसह रायगड जिल्हा पोलीस मुख्यालय अलिबाग येथे कवायत मैदानावर  अलिबाग, पेण,रोहा, खालापूर (चौक), मुरुड तालुक्यातील उमेदवारांनी सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2019 रोजी  सकाळी 7.00 ते 11.00 या वेळेत उपस्थित रहावे.  तर महाड, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, तळा, सुधागड-पाली तालुक्यातील उमेदवारांनी  मंगळवार दि.17 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 7.00 ते 11.00 या वेळेत उपस्थित रहावे.
होमगार्ड नोंदणीकरिता पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे : शिक्षण कमीत कमी दहावी उत्तीर्ण.  वयोमर्यादा 20 ते 25  वर्ष (दि.01 सप्टेंबर 2019 रोजी).  उंची पुरुषांकरिता 162 सें.मी. व महिलांकरिता 150 सें.मी. छाती पुरुषांकरिता 76 सें.मी. व फुगवून 81 सें.मी. (छाती 5 सें.मी. फुगवता येणे आवश्यक आहे).  खेळाडू, आय.टी.आय.,जडवाहन परवानाधारक, एन.सी.सी., बी व सी प्रमाणपत्र धारक,माजी सैनिक,नागरी संरक्षण असलेले परंतु स्थानिक ठिकाणी तीन प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र धारक यांना तांत्रिक अर्हता गुण दिले जातील.
नोंदणीकरिता आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे : रहिवासी पुरावा (आधारकार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र).  वय, शाळा सोडल्याचा दाखला, 10 वी किंवा 12 वी बोर्ड प्रमाणपत्र.  तांत्रिक अर्हता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र.  नुकतेच काढलेले पासपोर्ट साईज दोन फोटो.
कागदपत्रे व शारीरिक चाचणी तपासणीमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची गोळाफेक व धावणे मैदानी चाचणी घेण्यात येईल.  उमेदवारांना नोंदणीस स्वखर्चाने यावे लागेल तसेच नोंदणीच्या, मैदानी चाचणीच्या वेळी कोणतेही अपघाती घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील.  उमेदवाराची निवड पूर्णपणे गुणवत्तेवर करण्यात येईल.  होमगार्ड ही मानसेवी संघटना असून ती वेतनीय नाही.  पनवेल,उरण,कर्जत व नेरळ या होमगार्ड पथकातील अनुशेष शिल्लक नसल्याने सदर तालुक्यातील उमेदवारांनी नोंदणी अर्ज भरु नयेत व नोंदणी प्रक्रीयेत हजर राहू नये असे जिल्हा समादेशक होमगार्ड रायगड यांनी कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक