अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांनी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना 2022-23 चा लाभ घ्यावा

 


 

अलिबाग, दि.11 (जिमाका):- धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार केंद्र शासनाने अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या इ. 01 ली ते 10 वी या वर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी शासन निर्णय क्र. पपका-2007/270/07 असक, दि.23 जुलै 2008 अन्वये राज्यातील अल्पसंख्यक मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी व जैन या धार्मिक अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सन 2008-09 पासून सुरु झाली आहे. यावर्षी NSP 2.0 पोर्टलवर नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची सुरुवात दि.20 जुलै 2022 पासून सुरु झाली आहे. इयत्ता 1 ली ते 10 वी च्या वर्गामध्ये शिकणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना केंद्र शासनाद्वारे प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती देण्यात येते.

नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्याने अर्ज ऑनलाईन सादर करण्याची अंतिम तारीख- दि.30 सप्टेंबर 2022 तर शाळा स्तरावर अर्ज पडताळणीची अंतिम तारीख- दि.26 ऑक्टोबर 2022 ही आहे.

अटी व शर्ती:-इयत्ता 1 ली ते 10 वी च्या सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शासकीय/निमशासकीय / खाजगी अनुदानित/विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शासनमान्यता प्राप्त शाळांकडून शिक्षण घेणान्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही लागू आहे. अर्जदार विद्यार्थी मागील वर्षी 50 टक्के पेक्षा जास्त गुणाने उत्तीर्ण झालेला असावा. (केंद्र शासनाने कोविड-19 च्या प्रभावामुळे ही अट चालू वर्षांसाठी नूतनीकरण विद्यार्थ्यांसाठी शिथिल करण्यात आली आहे.)पालकाचे (कुटुंबाचे एकत्रित) वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखापेक्षा कमी असावे. पालकाचे वार्षिक उत्पनाचे प्रमाणपत्र हे सक्षम अधिकान्याने प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे.एका कुटुंबातील 2 पेक्षा जास्त विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती मिळणार नाही, अर्ज भरताना विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, बँक व आधार माहिती अचूक भरावी.धर्माबाबतचे स्वयंघोषणापत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, गुणपत्रक, आधारकार्ड/ आधार नोंदणी पावती, विद्यार्थ्यांचा फोटो, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत इत्यादी कागदपत्रे मुख्याध्यापकांना सादर करावीत. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी इतर तत्सम शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा. एकूण पात्र विद्यार्थ्यांपैकी 30 टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थीनींसाठी राखीव आहे. विद्यार्थी शिकत असलेल्या शाळांच्या वसतिगृहात राहत असतील अथवा राज्य शासनाच्या वसतिगृहात राहत असतील केवळ तेच विद्यार्थी या योजनेत वसतीगृहाचे विद्यार्थी म्हणून गणले जातात. तसेच वसतिगृहामध्ये भरलेल्या शुल्काच्या पावत्या शाळेच्या मुख्याध्यापकांना सादर करणे बंधनकारक आहे.

सन 2021-22 मध्ये शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या/ शिष्यवृत्ती मिळालेल्या आणि या शिष्यवृत्तीच्या अटी पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी सन 2022-23 करिता नूतनीकरण विद्यार्थी म्हणून अर्ज ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. नवीन अथवा नूतनीकरण यापैकी एकाच प्रकारचा अर्ज विद्यार्थ्यांना भरता येईल तसेच एका विद्यार्थ्याने नवीन नूतनीकरणासाठी दोनदा अर्ज भरला असेल तर असे अर्ज बाद ठरविले जातील.

विद्यार्थ्यांचे बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेचे असावे, नसल्यास पालकांच्या राष्ट्रीयकृत बँकखात्याची माहिती अर्जात भरता येईल, इयता 1 ली ते 10 वी मधील विद्यार्थ्याचे नवीन व नूतनीकरणाचे अर्ज National Scholarship Portal (NSP 2.0) (www.scholarships.gov.in) या संकेतस्थळावर भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची राहील. हे अर्ज भरण्याची सुविधा www.minorityaffairs.gov.in या संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध आहे.) अर्ज भरताना भ्रमणध्वनी क्रमांक लिहिणे आवश्यक आहे. हा क्रमांक पालकांचा असेल तर तो 02 पाल्यांसाठीच वापरता येईल.

अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्टया मागास गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना इ.01 ली ते 10 वी पर्यंत शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची होणारी गळती थांबविणे, अल्पसंख्यांक पालकांना त्यांच्या पाल्यास शाळेत पाठविण्यासाठी उत्तेजन देणे, अल्पसंख्यांक मुलांच्या पालकांचा त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणावर होणाऱ्या खर्चाचा भार कमी करणे, शिक्षणाव्दारे अल्पसंख्यांक मुलांचे सक्षमीकरण करणे, अल्पसंख्याक समाजाची सामाजिक/आर्थिक उन्नती होण्यास मदत करणे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक