मतदार जागृती बाबत नोडल अधिकाऱ्यांची कार्यशाळा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16:- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता मतदार केंद्रस्तरावर मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्याच्या भारत निवडणूक आयोगाच्या सुचना आहेत. त्या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व नोडल अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत नोडल अधिकारी यांची मतदार जनजागृतीत भूमिका, मतदार जनजागृती कार्यक्रम, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक इ.बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
दरम्यान जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयात भावी मतदार व नवीन मतदार यांच्यासाठी निवडणूक साक्षरता क्लब स्थापना करण्यात आल्या आहेत. तसेच मतदान केंद्रस्तरावर ‘चुनाव पाठशाळा’ स्थापन केल्या असून त्या मार्फत मतदार जनजागृती कार्यक्रम राबविले जात आहेत. तसेच सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, संस्था इ. मध्ये मतदार जागृती मंच स्थापन करण्यात येत आहेत. या मतदार जागृतीमंच मध्ये त्या-त्या कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी हे सदस्य आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, अन्य शासकीय निमशासकीय कार्यालयात मतदार जागृती मंच स्थापन झाले आहेत. अशी माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी वैशाली माने यांनी दिली आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक