जवाहर नवोदय विद्यालयाची निवडचाचणी परीक्षा 2 फ्रेब्रुवारी रोजी
अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.18:- जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता
नववी प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालय निवडचाचणी परीक्षा शनिवार दि. 2 फेब्रुवारी
रोजी जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर या केंद्रावर घेण्यात येईल.या परीक्षेसाठी
प्रवेश अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचे हॉल तिकीट www.navodaya.gov.in व www.nvsadmissionclassnine.in या
संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घेऊन दि.2 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वा. परीक्षा
केंद्रावर परीक्षेसाठी उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी परीक्षा प्रमुख संतोष
चिंचकर मो.9881351601 यांचेशी संपर्क साधावा असे प्राचार्य पि.के.नारायणन यांनी
कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment