जिल्हाधिकाऱ्यांनी केली महामार्गाच्या कामाची पाहणी



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15- राष्ट्रीय महामार्ग क्र.66 अर्थात मुंबई-गोवा महामार्गाच्या सध्या प्रगतीपथावर असलेल्या कामाची पळस्पे ते काराव दरम्यान जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी आज पाहणी केली.
आजदुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास डॉ.सुर्यवंशी यांनी पळस्पे ता.पनवेल येथून पाहणीस प्रारंभ केला.   यावेळी त्यांचे समवेत राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता श्री.अग्रवाल, पेण तहसिलदार अजय पाटणे तसेच अन्य  अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.  सदर महामार्ग कामाची विविध टप्प्यांवर असलेल्या कामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्यांनी पाहणी केली. काही ठिकाणी तांत्रिक कारणांमुळे निर्माण झालेले अडथळे तात्काळ दूर करावे, असे निर्देश डॉ.सुर्यवंशी यांनी संबंधिताना दिले.  तसेच जेथे जेथे काम करण्यात अडथळे निर्माण होत आहेत अशा सर्व स्थळांना डॉ.सुयवंशी यांनी भेट देऊन पाहणी केली.  पळस्पे ता.पनवेल येथून पाहणी करत करत ता.पेण पर्यंत त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक