पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15:-राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण हे  बुधवार दि.16 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
बुधवार दि.16 रोजी दुपारी पावणे चार वा. डोलवी येथे आगमन व श्री दत्तकृपा वाहन वाहतूक चालक-मालक संघटनेच्या नामफलकाचे अनावरण.  स्थळ : जे.एस.डब्ल्यू गोवा गेट डोलवी.  दु.चार वा.वडखळ ता.पेण ग्रुप ग्रामपंचायत येथे आगमन व ‘आमचा गाव आमचा विकास’ या उपक्रमांतर्गत आरोग्य, शिक्षण व उपजिविका इत्यादी घटकांबाबतचे साहित्य वाटप कार्यक्रम.  स्थळ : ग्रुप ग्रामपंचायत वडखळ.  सायं. पाच वा. वडखळ येथून कर्जतकडे प्रयाण.  सायं.साडे सहा वा. कर्जत नगर परिषद निवडणूकी संदर्भातील भाजपा कार्यकर्ता आढावा बैठक व मार्गदर्शन.  रात्री साडेआठ वा. कर्जत येथून  पलावा, डोंबिवलीकडे प्रयाण.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक