अलिबाग-साळाव मार्गे अवजड वाहतूक बंद : रोहा-चणेरा मार्गे वाहतूक करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15- साळाव,उसर,नागोठणे,थळ या अलिबाग तालुक्यातील गावांमधील औद्योगिक कारखान्यांद्वारे होणारी अवजड-अति अवजड वाहतूक ही रोहा मार्गे वळविण्याचे आदेश असून देखील या अति अवजड वाहनांची अलिबाग-रेवदंडा-चौल-वावे रस्त्यावरुन होत असते.  या रस्त्याची भारवाहन क्षमता ही अति अवजड वाहनांसाठी नाही. परिणामी या रस्त्याची हानी होत आहे. या वाहतुकीमुळे सहाण- पाल्हे बाह्यवळणावरील सहाण पाल्हे पूल क्षतिग्रस्त होण्याची शक्यता कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग यांच्या अहवालात नमुद करण्यात आली आहे. त्यानुसार  जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अलिबाग-साळाव व साळाव-अलिबाग ही अति अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले असून ही वाहतूक  राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरुन रोहा-चणेरा मार्गे करण्यात यावी, असेही आदेशात म्हटले आहे.  
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक