पनवेल येथे आजपासून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन



अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.17:- प्रादेशिक विद्या प्राधिकरण (राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था) नागपूर, रायगड जिल्हा परिषद शिक्षण  विभाग व सेंट विल्फ्रेड एज्युकेशन सोसायटी पनवेल जि.रायगड व जिल्हा विज्ञान व गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.18 ते रविवार दि.20 दरम्यान जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन पनवेल येथे करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 18 रोजी सकाळी या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यंदाचे हे आठवे विज्ञान प्रदर्शन आहे.
        या विज्ञानप्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार दि.18 रोजी सकाळी 11 वाजता सेंट विल्फ्रेड एज्युकेशन सोसायटी, शेडयुंग, पनवेल येथे होणार आहे. या उद्घाटनास राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. विनोद तावडे, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण,  विधानपरिषद सदस्य आ. जयंत पाटील, माजी पालकमंत्री सुनिल तटकरे यांची उपस्थित राहणार आहे.  तरअध्यक्षस्थानी केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गिते तर विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे,   खा.श्रीरंग बारणे उपस्थित राहणार आहेत. 
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषद सदस्य आ. बाळाराम पाटील, आ.अनिकेत तटकरे आ.निरंजन डावखरे तसेच विधानसभा सदस्य सिडकोचे अध्यक्ष तथा पनवेलचे आ. प्रशांत ठाकूर,आ.सुरेश लाड,कर्जत,आ.श्री.सुभाष पाटील, अलिबाग, आ.धैर्यशील पाटील पेण, आ.भरत गोगावले महाड, आ.अवधूत तटकरे,आ.मनोहर भोईर, उरण,  जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती अर्थ व बांधकाम समिती आस्वाद पाटील, जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर,शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग राजेंद्र अहिरे, सेंट विल्फ्रेड एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.केश बडाया, सेंट विल्फ्रेड एज्युकेशन सोसायटीचे संचालक अभिषेक जैन यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
या विज्ञान प्रदर्शनाचा  समारोप व पारितोषिक वितरण समारंभ रविवार दि. 20 रोजी दुपारी दोन वा. जिल्हा परिषद अध्यक्ष कु.आदिती तटकरे व उपाध्यक्ष ॲङ आस्वाद पाटील यांच्या हस्ते होणार आहे.  या प्रदर्शनास उपस्थितीचे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षण क्रीडा व आरोग्य सभापती नरेश तातूराम पाटील यांनी तसेच जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य) भाऊसाहेब थोरात, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ) शैलजा दराडे यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक