तटरक्षक तलातर्फे मच्छिमार बांधवांचा मेळावा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15- भारतीय तटरक्षक दलाच्या 42 व्या वर्धापन दिनानिमित्त आज नवीमुंबई येथील भारतीय तटरक्षक दलाच्या सरोवर विहार या परिसरात मच्छिमार बांधवांचा मेळावा पार पडला.  यावेळी रायगड व ठाणे जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांना सागरी सुरक्षाविषयक मार्गदर्शन करण्यात आले.  तसेच तटरक्षक दल व मच्छिमार बांधव यांच्यात मैत्रीपूर्ण व्हॉलीबाल सामनाही खेळण्यात आला.  याप्रसंगी तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक विवेक वाजपेयी, महाराष्ट्र समादेशक मुकूल गर्ग यांची विशेष उपस्थिती होती.
            या स्नेह मेळाव्यात करंजा, उरण, मोरा, सानपाडा, वाशी, घणसोली, कोपरखैरणे, ऐरोली,बेलापूर,दिवाळे येथून मच्छिमार बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.  तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी व मच्छिमार बांधवांनी परस्पर उदबोधन सत्रात समुद्रातील सुरक्षा उपायांबाबत चर्चा व मार्गदर्शन केले.  त्यात लाईफ जॅकेट, प्रथमोपचार पेटी, अग्निशमन यंत्र हाताळणीबाबत प्रात्याक्षिक दाखविण्यात आले.  मच्छिमार बांधवांनी समुद्रात मासेमारी करताना शासनाने दिलेले बायोमॅट्रिक ओळखपत्र सोबत बाळगावे तसेच समुद्रातील संशयास्पद हालचालींबाबत तात्काळ तटरक्षक दलास अवगत करावे, असे आवाहन तटरक्षक दल समादेशकांनी उपस्थित मच्छिमार बांधवांना केले. 
त्यानंतर तटरक्षक दल व मच्छिमार बांधव यांच्या दरम्यान मैत्रीपूर्ण व्हॉलीबॉल सामना झाला.  त्यातील उत्कृष्ट खेळाडूंना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक