अन् कातकरी बांधवांच्या चेहऱ्यावर फुलले हसू...!

अलिबाग, दि.5(जिमाका):- उरण तालुक्यातील अनेक कातकरी वाड्यावर आज उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जातीच्या दाखल्यांचे वाटप संपन्न झाले.

रायगड जिल्हाधिकारी तथा प्रभारी कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, पनवेल उपविभागीय अधिकारी श्री.राहुल मुंडके, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव, उरण तहसिलदार श्री. भाऊसाहेब अंधारे आणि त्यांच्या इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आज दि.5 नोव्हेंबर 2022 रोजी डुंबा ची कातकरीवाडी जासई, कोल्हापूर कातकरीवाडी चानजे, लिंबाची कातकरीवाडी, डावूर नगर कातकरीवाडी उरण येथील कातकरी बांधवांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले.

यावेळी श्री.संतोष घरत,जासई, रायगड भूषण दत्ता गोंधळी, सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर, आदिवासी प्रतिनिधी मनीष कातकरी हे उपस्थित होते.

जातीचे दाखले वाटप केल्यानंतर कातकरी बांधवांच्या चेहऱ्यावर अनमोल आनंद झळकत होता. उरण सामाजिक संस्थेने आदिवासी कातकरी बांधवांसाठी मागील दोन वर्षात केलेले काम पाहून दि.4 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी उरण सामाजिक संस्था व असे काम करणाऱ्या अन्य सामाजिक संस्थांच्या सहकार्याने जिल्ह्यातील प्रत्येक आदिवासी वाडीवर जातीचे तसेच अन्य शासकीय दाखले वाटप शिबिरे घेण्याचे निर्देश सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

कातकरी बांधवांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्याच्या या प्रयत्नांबद्दल प्रा.राजेंद्र मढवी यांनी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, उपविभागीय अधिकारी श्री.राहुल मुंडके, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव, तहसिलदार भाऊसाहेब अंधारे आणि सर्व मंडळ अधिकारी,आदिवासी विकास निरीक्षक,तलाठी,महसूल विभागातील इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानले आहेत.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक