माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केले अभिवादन


अलिबाग, दि.31 (जिमाका):- भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त व भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी कार्यालय येथे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.उदय सामंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, तहसिलदार विशाल दौंडकर, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी हे उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक