जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न

 



अलिबाग,जि.रायगड दि.17 (जिमाका) :- जिल्हा एड्स प्रतिबंध व  नियंत्रण  समितीची, एचआयव्ही/टीबी, ग्रेटर इन्व्हॉलमेंट ऑफ पीपल लिविंग विथ एचआयव्ही एड्स (जिपा) या समितीची आढावा बैठक (दि.15 डिसेंबर) जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात संपन्न झाली. 

                   यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ठोकळ,  जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डापकु संजय माने, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक एन.एच.एम. डॉ.चेतना पाटील, वरिष्ठ वैद्यकीय  अधिकारी, एआरटी केंद्र अलिबाग डॉ. पांडुरंग शिंदे, आयसीटीसी इन्चार्ज/ रक्त संक्रमण अधिकारी डॉ. दीपक गोसावी, जिल्हा असिस्टंट एम अँड ई  डापकु रश्मी सुंकले, प्रतिनिधी महिला व बाल  विकास अधिकारी श्री. पंकज पाटील, महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट, पेण, प्रतिनिधी लोकपरिषद पनवेल, श्रीम.जयश्री मोकल, जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी, एन.एच.एम, रायगड, जिल्हा सहाय्यक लेखा, डापकु रवींद्र कदम, डॉट्स प्लस सुपरवायझर रायगड मनोज बामणे, संजय गांधी योजना शाखा पी. आर. किल्लेकर, प्रतिनिधी, आधार विहान पनवेल ई श्रीम. जागृती गुंजाळ  तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

                   यावेळी जिल्हा एड्स   प्रतिबंध व नियंत्रण विभाग रायगड, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग  यांनी मागील वर्षातील कामकाजाचा आढावा घेऊन रायगड जिल्ह्यामध्ये एचआयव्ही संसर्गिताचे प्रमाण घटत असल्याचे सांगितले. प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था यांच्या आदेशानुसार तसेच मार्गदर्शक सूचनेनुसार यावेळी elimation of  mother  to  child  transmission  committee  (EMTCT) या  समितीची स्थापना करून बैठक घेण्यात आली.

                    रायगड जिल्ह्यात एचआयव्ही संसर्गित रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा एड्स नियंत्रण विभाग कार्यरत आहे. या विभागाकडून एचआयव्हीबाबत प्रबोधन, एचआयव्हीग्रस्तांचे समुपदेशन केले जाते. जिल्ह्यात 2014-15 मध्ये एचआयव्ही  संसर्गित  रुग्णाची संख्या 417 (0. 68 टक्के ) इतके होते. त्यात घट होऊन नोव्हेंबर 2020 पर्यंत हीच संख्या अवघ्या 160 (0. 3 टक्के) वर येऊन ठेपली आहे. या घटत्या आकडेवारीवरून रायगड जिल्ह्याची एचआयव्ही मुक्तीकडे वाटचाल सुरु असल्याचे आशादायक चित्र दिसून येत आहे.

                   जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी दिलेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यात सर्वसामान्य जनतेमध्ये ज्याप्रमाणे एचआयव्ही  संसर्गित रुग्ण संख्या घटत आहे. त्याचप्रमाणे एचआयव्ही  संसर्गित गरोदर मातांच्या संख्येतही घट होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात वर्ष 2014-15 मध्ये 41 हजार 430 गरोदर मातांची  तपासणी करण्यात आली त्यापैकी 29 माता एचआयव्ही पॉझिटिव्ह आलेल्या असून या सर्व माता एआरटी उपचार घेत असल्याचे स्पष्ट होत आहे. तर नोव्हेंबर 2020 पर्यंत 25 हजार 729 गरोदर मातांची तपासणी झाली असून त्यामध्ये अवघ्या 20 माता एचआयव्ही पॉझिटिव्ह आलेल्या असून त्यापैकी 20 माता या एआरटी उपचार घेत असल्याचे स्पष्ट होत आहे. सन  2020-21 मध्ये एकूण 15 बालकांची डीबीएस (Dry Blood Spot) तपासणी करण्यात आली असून 15 (100 टक्के) बालके एचआयव्ही संसर्गित नसल्याचे स्पष्ट होत आहे. EMTCT कार्यक्रमांतर्गत मातेकडून बालकाला होणारा  एचआयव्ही संसर्ग प्रतिबंध करण्यामध्ये शासनाला 100 टक्के यश आलेले आहे.

                     रायगड जिल्ह्यामधील जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालये, नगरपालिका दवाखान्यांमध्ये एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्रात मोफत एचआयव्ही समुपदेशन उपलब्ध करण्यात आले आहे.    आयुक्तांच्या सूचनेनुसार जिल्हास्तरावर मा. सर्वोच्च न्यायालयाने क्रिमिनल अपील क्र. 135/2010 मध्ये दिलेल्या आदेशानुषंगाने व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत सुटका करण्यात आलेल्या पीडितांना तसेच वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना कोरडे अन्नधान्य व आर्थिक सहायय करण्याकरीता समिती गठित केली आहे.त्यामध्ये एकूण 401 महिलांना व 15 बालकांना कोरडे अन्नधान्य व आर्थिक मदत करण्यात आली असून दिनांक 28 ऑक्टोबर 2020 रोजी  जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या सभेमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना प्रत्येकी रक्कम रु. 5 हजार  व त्यांच्या मुलांना प्रत्येकी रक्कम रु. 2 हजार 500 यानुसार लाभ देण्यात येणार आहे. त्यानुसार 139 महिलांची बँकेमध्ये खाते उघडून त्यांची स्वतंत्र यादी महिला व बाल  विकास विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे योग्य त्या आर्थिक मदतीकरिता पाठविण्यात आलेली आहे.   

                   आधार ट्रस्ट, पनवेल यांच्यामार्फत कोविड-19 च्या  पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीमध्ये एकूण 460 पीएलएचआयव्ही यांना अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले असल्याचे सांगितले.

                   ओएनजीसी कंपनी उरण यांच्यामार्फत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालयास मोबाईल आयसीटीसी व्हॅनचा पुरवठा करण्यात आला असून वाहनांच्या मोडिफिकेशन करिता ओएनजीसी कंपनी उरण यांच्याकडे प्रस्थाव सादर करण्यात आलेला आहे.

         या बैठकीत रक्त संक्रमण अधिकारी डॉ. दीपक गोसावी  यांनी सन 2020-21 मध्ये 5 हजार 500 बाटल्या रक्त संकलन झालेले असून सद्य:स्थितीत रक्तपेढीमध्ये आवश्यक असणारा रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध असून यापुढे लागणाऱ्या रक्त संकलनाचे /  शिबिराचे नियोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.

        या बैठकीकरिता उपस्थित असणाऱ्या सर्व सदस्यांचे स्वागत तसेच आभार प्रदर्शन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डापकु  संजय माने यांनी केले.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक