जवाहर नवोदय विद्यालयात इ.6 वी व इ.9 वी च्या प्रवेशासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यास मुदतवाढ

 


 

         अलिबाग,जि.रायगड दि.15 (जिमाका) :- जवाहर नवोदय विद्यालयात सत्र 2021-22 करिता इयत्ता 6 वी व इयत्ता 9 वी च्या प्रवेशासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख दि.15 डिसेंबर 2020 पर्यंत होती.

परंतु आता नवोदय विद्यालय समितीच्या पत्रानुसार ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या तारखेस मुदतवाढ देण्यात आली असून इयत्ता 6 वी साठी मंगळवार, दि.29 डिसेंबर 2020  तर इयत्ता 9 वी साठी गुरुवार, दि.31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  ऑनलाईन फार्म भरण्यासाठी www.navodayagov.in या संकेतस्थळाचा वापर करावा.

             रायगड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जास्तीत-जास्त संख्येने या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी व प्राचार्य श्री.बोभाटे  यांनी केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक