महाराष्ट्र ग्रामिण जीवनोन्नती अभिया: बचतगटांना केलेल्या पतपुरवठ्यामुळे ग्रामविकासाला चालना-दिलीप हळदे



दि.2-(जिमाका) गावा-गावात तयार केलेल्या बचतगटांना बँकानी पतपुरवठा केल्यास बचतगटांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या संधी निर्माण होऊन ग्रामविकासाला चालना मिळेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी आज येथे केले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रायगड-अलिबाग यांच्यावतीने स्व.प्रभाकर पाटील सभागृह जिल्हा परिषद येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय बँकर्स कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
            यावेळी अति.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवऋषी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी रामदास बघे, गटविकास अधिकारी अविनाश घरत, कोकण विभागाचे आर्थिक समावेशक सल्लागार श्री.कासवटे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.निखिलकुमार ओसवाल, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दत्तात्रय पाथरुट, एन.आय.आर.डी.चे हैद्राबाद येथील प्रशिक्षक एल रामचंद्र रेड्डी, पी.मोहनीया  आदी उपस्थित होते.
            यावेळी मार्गदर्शन करताना श्री.हळदे म्हणाले की, जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता बचत गटांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी त्यांना बँकामार्फत पतपुरवठा करण्यात येतो.   त्याचा योग्य लाभ घेऊन बचत गटांनी आपली आर्थिक उन्नती साधावी.  तसेच बचत गटांची बांधणी करणे,बंद असलेल्या बचत गटांना पुर्नजीवीत करणे,त्यांना फिरता निधी देणे, पतपुरवठा करणे याबाबतची माहिती व्हावी यासाठी  या एकदिवसीय बँकर्स कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.  यापूर्वी रायगड जिल्हा नॉन इन्सेटीव्ह मोड या क्षेत्रात होता.  1 एप्रिल 2019 पासून तो इन्सेटीव्ह मोडमध्ये समावेशित झाला आहे.  यावेळी सन 2018-19 या वित्तीय वर्षामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या बँक अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
            कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील बँकाचे अधिकारी,कर्मचारी तसेच स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी आर.पी.बघे व  त्यांचे सर्व सहकारी यांनी परिश्रम घेतले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक