जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज मागविले



अलिबाग, जि. रायगड, दि.2 (जिमाका)-राज्याचे युवा धोरण – 2012 मधील शासन जिल्ह्यातील युवांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हास्तर युवा पुरस्कार प्रतिवर्षी देण्यात येतो. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील इच्छूक संस्था व व्यक्तिंकडून मंगळवार दि.30 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.
पुरस्काराचे स्वरूप-
जिल्हास्तर युवा पुरस्कार- जिल्हास्तरावर एक युवक, एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना पुरस्कार देण्यात येईल. सदरचा पुरस्कार गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम रू. 10 हजार (प्रति युवक व युवतींसाठी), प्रति संस्थेसाठी गौरवपत्रए, सन्मानचिन्ह, रोख रक्कम- रु. 50 हजार अशा स्वरूपाचा असेल.
पात्रतेचे निकष –
·                    अर्जदार युवक/युवतींचे वय पुरस्कार वर्षातील 1 एप्रिल रोजी 13 वर्षे पूर्ण व 31 मार्च रोजी 35 वर्षे पर्यंत असावे.
·        जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे त्या जिल्ह्यात सलग 5 वर्ष वास्तव्य
·        पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेस विभागून दिला जाणार नाही.
·        पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात येणार नाही.
·        केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. (उदा. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती व फोटो इ.)
·        अर्जदार युवक व युवतीने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्षे क्रियाशील कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील.
·        अर्जदार व्यक्तीचे कार्य हे स्वयंस्फूर्तीने केलेले असावे.
·        एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही.
·        केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी तसेच विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.
संस्थांसाठी पात्रता निकष –
·        पुसस्कार संस्थेस विभागून दिला जाणार नाही.
·        संस्थांनी केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. (उदा. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती व फोटो इ.)
·        अर्जदार संस्थेने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्षे क्रियाशील कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील.
·        अर्जदार संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1860 किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950 नुसार पंजीबध्द असावी.
·        अर्जदार संस्था नोंदणी झाल्यानंतर किमान पाच वर्षे कार्यरत असणे आवश्यक आहे.
·        अर्जदार संस्थांचे कार्य हे स्वयंस्फुर्तीने केलेले असावे.
·        एक जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी संस्था राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही.
·        अर्जदार/संस्थेच्या सदस्यांचा पोलिस विभागाने प्रमाणित केलेला चारित्र्य दाखला (संबंधित परिक्षेत्रातील पोलिस स्टेशन) देणे आवश्यक राहील.
पुरस्कारासाठी मुल्यांकन-
·        युवा व युवा विकासाचे कार्य करणा-या संस्थांनी केलेले कार्य दि. 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2019 या कालावधीतील गत तीन वर्षाची केलेली कामगिरी विचारात घेण्यात येईल.
·        युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य.
·        राज्याचे साधन संपत्ती जतन संवर्धन तसेच राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे कार्य.
·        समाजातील दुर्बल घटक, अनुसुचित जाती, जमाती व जनताजी आदिवासी भाग इ. बाबतचे कार्य.
·        शिक्षण, प्रौढ शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा, मनोंरंजन, विज्ञान तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, स्त्रीभ्रुण, व्यसनमुक्ती तसेच युवांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य.
·        राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य.
·        नागरी गलिच्छ वस्ती सुधारणा, झोपडपट्टी,  आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या, महिला सक्षमीकरण इ. बाबत कार्य, साहस इ. बाबतचे कार्य.
जिल्हा पुरस्कारासाठी अधिक माहिती व लाभार्थीनी करावयाचा विहीत अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे उपलब्ध आहे. इच्छुक युवांनी/युवा संस्थांनी आपले अर्ज  जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे दि.30 पर्यंत सादर करावे,अधिक माहिती करिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक