शेतकरी, पशुपालकांचा सन्मान करुन साजरा केला कृषिदिन



अलिबाग, जि. रायगड, दि.1 (जिमाका)-जिल्ह्यातील उपक्रमशिल शेतकरी व पशुपालकांचा सन्मान करुन रायगड जिल्ह्यात कृषि दिन आज मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, उपाध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित या कार्यक्रमास 36 शेतकरी व 35 आदर्श पशुपालक यांच्या सन्मान करण्यात आला. तसेच  सासवणे ता. अलिबाग येहील पोल्ट्री व्यावसायिक व पशुखाद्य उत्पादक, औषध निर्माता डॉ. श्याम ढवण यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादनाला थेट बाजारपेठ मिळावी यासाठी ऑनलाईन मार्केटिंग करता यावी यासाठी ‘रायगड कृषि बाजार’ या मोबाईल ॲप चे प्रकाशनही आदितीताई तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. आजपासून हे ॲप शेतकऱ्यांना डाऊनलोड करता येऊन वापरता येणार आहे.
या कार्यक्रमास उपाध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील, महिला बालकल्याण सभापती उमा मुंढे, समाजकल्याण सभापती राजाराम डामसे, जि.प. सदस्या चित्रा पाटील,योगिता पारधी, पदमा पाटील, उमा कासार तसेच जिल्हा परिषदेचे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश गजऋषी,  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडुरंग शेळके, कृषि विकास अधिकारी लक्ष्मण कुरकुटे, जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉ.बंकट आर्ले तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कृषि मालाचे ब्रॅंडींग करुन ते बाजारात नेण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. जेणे करुन मध्यस्थांची भूमिका मर्यादित होऊन  शेतकऱ्याला अधिकाधिक उत्पन्न मिळावे.  त्यादृष्टीने जिल्ह्यातील पांढऱ्या कांद्याला जी.आय. मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. तसेच काजू लागवडीचे क्षेत्र वाढविणे, स्थानिक कृषि उत्पादनांना प्राधान्य देण्यासाठी विविध योजनांमधून प्रशासन प्रयत्न करीत आहे.  याशिवाय जिल्ह्यात रिव्हर्स मायग्रेशन हा उपक्रम राबवून अन्यत्र रोजगारानिमित्त स्थलांतरीत झालेल्या 132 भूमिपूत्रांना पुन्हा जिल्ह्यात आणून शेती व स्थानिक उद्योग व्यवसायात चालना देण्यात आली आहे.
जि. प. अध्यक्ष आदितीताई तटकरे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आणि पशुपालकांना प्रोत्साहित करण्यासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्काराच्या निमित्त शेतकऱ्यांमध्ये निकोप स्पर्धा वाढीस लागावी व शेतकऱ्यांनी अधिकाधिक दर्जेदार उत्पादनासाठी, शेतीच्या आधुनिकीकरणासाठी प्रयत्न करावेत. त्यादृष्टीने शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेले रायगड कृषि बाजार हे मोबाईल ॲप खूप उपयुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सत्कारार्थी शेतकऱ्यांच्या वतीने मारुती दंत व मृण्मयी शेंबेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी केले.  ना. ना. पाटील विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी शेतकरी गीत सादर करुन उपस्थितांचे मने जिंकली. वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली.
 सन्मानीत करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची नावे-
1)रविंद्र महादेव गुरव-मु.झिराड,ता.अलिबाग,2)जानू नवशा लोभी-मु. बोपोली ताडवागळे 3) लक्ष्मण्‍ बळीराम तांडेल- मु. देवळी ता. पेण,4)लक्ष्मण् परसू वारगडा- मु.हेदोशी ता.पेण 5)पांडुरंग नारायण दिसले- मु.खानाव ता.पनवेल,6)एकनाथ कमलू भगत-मु. शिवकर ता.पनवेल ,7)रविंद्र वामन काठे- मु.नागांव ता.उरण,8)अरुण साध्या शिंगवा-मु.रानसई ता.उरण,9)दत्तात्रेय भिकाजी पायगुडे- हतनोली ता. खालापूर,10)युवराज भाऊ धारपवार- मु.विनेगांव ता.खालापूर,11)प्रकाश लक्ष्मण कुडले-मु. उद्धर ता.सुधागड पाली,12)रमेश पांडुरंग हंबीर- मु.राबगांव ता.सुधागड पाली,13)प्रविण देवराम म्हात्रे- मु.घोसाळे ता. रोहा,14)चंद्रकांत गणपत जाधव.मु. नडवली ता.रोहा,15) तानाजी हरिभाऊ पाटील -मु.खांडपे ता.कर्जत,16)अरुण वसंत घाग-मु.कोठींबे- ता.कर्जत,17)गंगाराम जानू देवाळा-मु.बेलवाडी ता.मुरुड,18)विष्णू लक्ष्मण वाघमारे-मु.सुरई ता.मुरुड,19)विठोबा लक्ष्म्ण हावरे,मु. रानवली, ता. श्रीवर्धन, 20)दशरथ आबाजी पवार-मु.धारवली ता.श्रीवर्धन,21)नथुराम लक्ष्म्ण तावडे,मु.सालविंड ता.म्हसळा, 22)सुनित राम सावंत-मु.वारळ ता.म्हसळा,23)प्रशांत धर्मा जाधव,मु.सुरवे ता.माणगांव,24)रामचंद्र बाबू लोखंड,मु.चांदरे ता.माणगांव,25)मोहन नथूराम रेशीम-मु.नांदगांव ता. महाड,26)मारुती जानू कळंब- मु.जिते ता.महाड,26)नामदेव धोंडीराम शिंदे-मु.कोतवाल खु. ता.पोलादपूर,28)संकेत नारायण म्हस्के-मु.माटवण ता. पोलादपूर,29)हरेश जनार्दन पवार-मु.पिरसई ता.तळा,30)गजानन दामू पारावे-मु.वावेहवेळी ता.तळा,31)पांडुरंग जैटू कुरुंगळे-मु.कांबे ता.खालापूर,32)मारुती काशिराम दंत-मु. आपटवणे ता. सुधागड-पाली,33)संदेश गजानन विचारे-मु.ता.रोहा, 34)लक्ष्म्ण भिकू गायकर-मु.जोसरांजण,ता. मुरुड, 35)वैभव श्रीकृष्ण् जोशी- मु.हरिहरेश्वर् ता.श्रीवर्धन,36)लक्ष्मण् दशरथ येरुणकर -मु.फौजदारवाडी ता.पोलादपूर.,
सन्मानीत करण्यात आलेल्या पशुपालकांची नावे-
1)परशुराम दिनकर पाटील- मु.हमरापूर ता.पेण,2) उमेश बाळूकृष्ण् मोडक-मु.सापोली ता.पेण,3)यशवंत दुंदा जाधव- मु.सुगवे ता.कर्जत, 4)शिवाजी जगन बिबवे-मु.जांमरुग ता.कर्जत,5)जयदास भाऊ घोंगे-मु.उसरोली ता.खालापूर,6)राघो दामा जांभळे-मु. रीस ता.खालापूर, 7)सुरेंद्र बाळकृष्ण् खेडेकर- मु.कवेळे ता.सुधागड पाली, 8) दत्ताराम कोंडे-मु.नेगवली ता.सुधागड पाली,9)प्रदिप कमळाकर घरत-मु.जासई ता.उरण, 10)निलेश कमलाकर घरत-मु.जासई ता.उरण, 11)गणपत हरी मांडवकर-मु.वाशी महागांव ता. तळा,12)भिमसेन शिवराम शिंदे,मु.वांजळोशी ता.तळा 13)सिताराम रामचंद्र कोदे-मु.जामगांव ता. रोहा,14)कृष्णा देवजी मढवी-मु.डोंगरी  ता.रोहा, 15)अमजद इक्बाल करबेलकर-मु.वावे,ता. पोलादपूर, 16)रामचंद्र महादेव सकपाळ- मु.कापडे बुद्रुक ता.पोलादपूर,17)मोतीराम बाळाराम परबळकर-मु.सवे ता. श्रीवर्धन,18)सुरेश मांडवकर-मु.रानवली ता. श्रीवर्धन, 19)रविंद्र दामोदर पालांडे,-हेटघर,ता. महाड, 20) संजय बळीराम सावंत-मु.वाघेरी ता.महाड, 21) मृण्म् यी मयुरेश शेंबेकर-मु. गोंधळपाड ता.अलिबाग,22)मयुर महेंद्र साळवी-मु.नागझरी ता.अलिबाग, 23)सुरेश आल्या गोंधळी- मु.विचुंबे ता.पनवेल. 24)चंद्रकांत बाळाराम पाटील- मु.वांवजे ता.पनवेल,25)केशव रामचंद्र कासारे-मु.बारशीव ता.मुरुड,26) परशुराम रामा रामाणे-मु.महालोर-ता.मुरुड,27)श्रावण भागोजी कोळी-मु.खरवली आदिवासी वाडी- ता.माणगांव, 28)सुधीर शांताराम दिवेकर-मु.चादुरी ता. माणगांव, 29)चंद्रकांत लक्ष्म् ण बेडेकर –मु.काळसुरी ता. म्हसळा, 30) भास्कर् हरि भायदे, मु.खारगाव बु.ता. म्हसळा, 31)जगन्नाथ शांताराम पाटील- मु.आंदोशी ता. अलिबाग., 32) दैविक जोमा पाटील-मु.शिवकर,ता. पनवेल, 33)रामजी पांडुरंग वने-मु.काजूवाडी ता.मुरुड, 34) उदय दगडू लाड-मु.काकळ ता.माणगांव, 35) बाळाराम लाख्या पाटील-मु.मेंदडी ता. म्हसळा,
विशेष सत्कार- डॉ.शाम ढवण- मु.सासवणे ता.अलिबाग
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक