अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी वाढदिवस फलक रायगड जि.प.प्रशासनाचा उपक्रम



अलिबाग, जि. रायगड, दि.1 (जिमाका)- रायगड जिल्हा परिषद प्रशासनाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी स्वतंत्र वाढदिवस फलक आजपासून सुरु केला आहे. या फलकाचे आज जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे यांच्याहस्ते अनावरण करण्यात आले. 
            रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपली हळदे यांच्या संकल्पनेतुन हा वैशिष्टयपूर्ण उपक्रम सुरु करण्यात आला आहे.  आज या फलकाच्या अनावरण प्रसंगी जि.प.अध्यक्ष आदितीताई तटकरे, उपाध्यक्ष ॲङआस्वाद पाटील, शिक्षण व आरोग्य सभापती नरेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश गजऋषी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई आदी उपस्थित होते.  जिल्हा परिषदेच्या स्वागत कक्षात हा कार्यक्रम पार पडला.  यावेळी आज (दि.1 जुलै) वाढदिवस असलेले शिक्षण विस्तार अधिकारी सुनिल गवळी, वरिष्ठ सहाय्यक सीमा राजेंद्र गायकवाड, कनिष्ठ सहाय्यक  मंगला पवार, राजाराम फडतरे, शिपाई राकेश पाटील यांचा एकत्रित वाढदिवस साजरा करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
            या वैशिट्यपूर्ण उपक्रमामुळे कर्मचारी,अधिकारी वर्गात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होईल अशी अपेक्षा श्री.हळदे यांनी व्यक्त केली.  या उकप्रमाच्या उद्घाटनास महिला व बालकल्याण सभापती उमा मुंढे, समाजकल्याण सभापती राजाराम डामसे, सदस्य मोतीराम ठोंबरे, चित्राताई पाटील तसेच सर्व खातेप्रमुख आवर्जून उपस्थित होते.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक