प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल येथे वाहन लिलाव

वृत्त क्र.344                                                                                                दिनांक:-23 जून 2017
प्रादेशिक परिवहन कार्यालय
पनवेल येथे वाहन लिलाव
अलिबाग,दि.23,(जिमाका):- प्रादेशिक परिवहन कार्यालय,पनवेल या कार्यालयात महाराष्ट्र कर कायदा 1958 तसेच मोटार वाहन कायदा 1988 मधील तरतूदी वापरुन वायुवेग पथकातील अधिकाऱ्यांनी वाहन अटकाव केलेली आहेत. अशी वाहन या कार्यालयासमोर असलेल्या जागेत अटकाव केलेल्या स्थितीत ठेवण्यात आली आहेत.
वायुवेग पथकाने अटकावून ठेवलेल्या व थकित कर असलेल्या एकूण 30 वाहनांचा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील तरतूदी वापरुन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल या ठिकाणी 30 जून 2017 रोजी दुपारी 12.30 वाजता जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. लिलावाच्या अटी व शर्ती तसेच अनामत रक्कम याबाबतची माहिती कार्यालयात अभियोग कक्षात उपलब्ध आहे.  तरी इच्छुकांनी लिलावात भाग घ्यावा. असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांनी केले आहे.
000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक