पोलादपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश अर्ज भरणे प्रक्रीया सुरु

वृत्त क्र.341                                                                                         दिनांक:-23 जून 2017
पोलादपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्था
प्रवेश अर्ज भरणे  प्रक्रीया सुरु
अलिबाग,दि.23,(जिमाका):- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पोलादपूर मध्ये प्रवेश सत्र ऑगस्ट-2016 करीता मंजूर असलेल्या-इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, वेल्डर, शिटमेटलवर्कर तसेच सुईंग टेक्नॉलॉजी या व्यवसायांकरिता प्रवेश अर्ज  भरणे प्रक्रीया  सुरु झाली असून 2 जुलै 2017 पर्यंत सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत online पद्धतीने http://admission.dvel.gov.in या संकेतस्थळावर सुरु करण्यांत आली आहे. तसेच online पद्धतीने भरलेले अर्ज 3 जुलै 2017  सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विहीत शुल्क आकारुन निश्चित (comfirmatio)  करण्यात येणार आहेत.
इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक व  फिटर ट्रेड करिता उमेदवार 10 वी उत्तीर्ण, वेल्डर, शिटमेटलवर्कर ट्रेड करिता इयत्ता 10 वी उत्तीर्ण,अनुतीर्ण तर कटींग व  सुईंग करिता 8 वी उत्तीर्ण अशी शैक्षणिक  पात्रता आहे.
तरी प्रवेशोच्छुक उमेदवारांनी अधिकच्या माहितीकरिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पोलादपूर मु.रानाबाजीरे (रानवडी रोड),पोष्ट-कापडे बुद्रुक, ता.पोलादपूर, जि.रायगड, दूरध्वनी क्र. 02191-240214 येथे संपर्क साधावा. असे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पोलादपूर यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक