जिल्हा न्यायालयात मध्यस्ती जागृती कार्यक्रम संपन्न

जिल्हा न्यायालयात
मध्यस्ती जागृती कार्यक्रम संपन्न


 अलिबाग दि.19 (जिमाका):-  विधी सेवा प्राधिकरण,रायगड-अलिबाग यांच्या विद्यमाने नुकताच  प्रमुख जिल्हा न्यायाधीश  मु.गो.सेवलीकर यांच्या अध्यक्षतेखाली  मध्यस्ती जागृती  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमास दिवाणी न्यायाधीश व.स्तर एल.डी.हुली, जिल्हा सरकारी वकील प्रसाद पाटील, वकील संघटनेचे अध्यक्ष प्रविण ठाकूर, वकील जे.एच.चेऊलकर, श्रीराम ठोसर,उपस्थित होते.
            यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश रायगड यांनी आपल्या न्यायालयीन कामकाजात आलेले पोटगीचे  प्रकरण मध्यस्ती मार्फत कसे निकाली निघाले याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तर जिल्हा सरकारी वकील प्रसाद पाटील , विधिज्ञ जे.एच.चेऊलकर, श्रीराम ठोसर यांनीही वेगवेगळया पध्दतीने मध्यस्ती प्रक्रिया या विषयावर मार्गदर्शन केले.
            यावेळी राष्ट्रीय विधी व प्राधिकरण दिल्ली यांच्याकडून प्राप्त झालेली प्रार्थना म्हणून कार्यक्रमाला सुरुवात झाली.   दिवाणी न्यायाधीश व.स्तर श्री. हुली यांनी आपल्या प्रास्ताविकात मध्यस्ती  संकल्पनेचा हेतू स्पष्ट  केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वकील श्रीमती पल्लवी तुळपुळे यांनी केले तर श्रीमती वर्षा पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.कार्यक्रमास वकील वर्ग व पक्षकार मोठया संख्येने उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक