मतदार नोंदणी विशेष मोहिम सर्व संबंधितांनी लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर

वृत्त क्र.338                                                                                                    दिनांक:-22 जून 2017
 मतदार नोंदणी विशेष मोहिम
सर्व संबंधितांनी लाभ घ्यावा
                                          -   जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर
 अलिबाग, दि.22 :-   भारत निवडणूक आयोगाने लोकशाही अधिक बळकट व्हावी व मतदाराला  जागृत करुन त्याचा मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग वाढावा या हेतुने विशेष मतदार नोंदणी अभियान 1 जुलै ते 31 जुलै 2017 या कालावधीत राबविण्यात येणार असून सर्व संबंधित मतदारांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत  ते बोलत होते. 
यावेळी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणुक अधिकरी श्रीमती प्रतिमा पुदलवाड, उपजिल्हाधिकारी श्रीमती जयमाला मुरुडकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की,  ही मतदार मोहीम रायगड जिल्हयात गावपातळीपर्यंत पोहोचवून जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी प्रसारमाध्यमांनी सहकार्य करावे. तसेच  या मोहिमेत मतदारांना विशेषत:  महिला, अपंग व तरुणांना मतदार करुन घेण्यात येणार आहे. सदर मोहिमेत 18 ते 21 वयोगटातील म्हणजे  पात्र भावी मतदार यांना नमुना नं.6 चा अर्ज भरुन संबंधित BLO , तहसिल कार्यालय, उपविभागीय कार्यालयात जमा करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. तसेच महिला मतदारांचे व अपंग मतदारांचे प्रमाण वाढविण्यासाठी आशा वर्कस, अंगणवाडी सेविका यांची मदत घेऊन नोंदणी करण्यात येईल. या कालावधीत BLO हे घरोघरी जावून तरुण मतदार महिला/अपंग यांची नोंदणी करतील.
युवा मतदारांकरिता कॉलेजमध्ये प्रवेश घेताना नमुना नं.6 चे फॉर्म भरुन दयावयाचे आहेत.  जिल्हयातील संबंधित महाविद्यालयाच्या  प्राचार्यांना तरुण मतदार नोंदणी करिता नोडल ऑफीसर म्हणून नेण्यात येणार आहे. तसेच  संबंधित महाविद्यालयांना सदरचे नमुना फॉर्म उपलब्ध करुन देण्यात येतील. त्याचप्रमाणे सदर मोहिमेअंतर्गत ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत नाही त्यांच्या साठी मतदार यादीतील नावांतील दुरुस्ती करण्याबाबत संधी उपलब्ध होत आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
राज्य मतदार दिवस
मा.भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राष्ट्रीय मतदार दिनाच्या धर्तीवर राज्य मतदार दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून 5 जुलै रोजी पहिला राज्य मतदार दिवस साजरा करण्यात येईल. या मतदार दिवसाकरीता मतदार हाच नागरीक जबाबदार, मतदाता ही हे नागरीक जिम्मेदार , Be a Voter, Better Citizen  हे घोषवाक्य जाहिर करण्यात येत आहे. त्यास अनुसरुन युवक, महिला, अपंग, तृतीयपंथी, सैन्यदलातील कर्मचारी इत्यादी प्रत्येक घटकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला मतदार, युवा मतदार, विशिष्ट प्रवर्गातील मतदार, सहकारी विभाग, प्रसार माध्यम प्रतिनिधी आदि माध्यमांतून विविध कार्यक्रमांच्या आयोजनाने राज्य मतदार दिवस साजरा करण्यात येत आहे. या संदर्भातही सर्व संबंधित यंत्रणांनी उत्साहाने मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. या भावनेने कार्यरत रहावे व अधिकाधिक मतदार नोंदणी होईल असे पहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक