जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत आयुष विभागामार्फत जागतिक योग दिन व योग जानजागृती अभियान साजरे

जिल्हा सामान्य  रुग्णालय अंतर्गत आयुष विभागामार्फत
जागतिक योग दिन व योग जानजागृती अभियान साजरे
अलिबाग,दि.21,(जिमाका):-जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील राष्ट्रीय आरोग्य अभियान  अंतर्गत आयुष विभागाद्वारे जागतिक योग दिनानिमित्त  जिल्हा रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, अलिबाग येथे आज  योग दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ.अनिल फुटाणे,अति.जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ.सुहास कोरे,निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क), डॉ.जगदिश दिवकर, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा प्रशिक्षण केंद्र रा.जि.प.अलिबाग,जिल्हा आयुष अधिकारी डॉ.चेतना पाटील, डॉ.अर्चिस पाटील व डॉ.वैशाली पाटील,आयुर्वेद वैद्यकीय अधिकारी, डॉ.रश्मी गंभीर,होमिओपॅथी वैद्यकीय अधिकारी,डॉ.अब्दुल बारी शेख,युनानी वैद्यकीय अधिकारी,आर्ट ऑफ लिव्हिंगचे योगमार्गदर्शक श्री.दामोदर पाटील व श्रीम.स्मिता देवळे, सामान्य् रुग्णालयातील प्रशिक्षिका सौ.सीमा रेजा,आयुष सहाय्यक श्री. रुपेश पाटील व श्रीम.दिपाली म्हात्रे तसेच जिल्हा रुग्णालयाच्या अधिनस्त  अधिकारी, कर्मचारी व परिचर्या विद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            जागतिक योगदिनानिमित्त योग जनजागृती  अभियान दिनांक 14 जून ते 21 जून 2017 रोजी जिल्हयातील निरनिराळया ठिकाणी राबविण्यात आला. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा शल्य् चिकित्सक डॉ.अजित गवळी यांनी मार्गदर्शन केले. या अभियानांतर्गत मोठया संख्येने विद्यार्थी, सर्वसामान्य् जनता तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रबोधनासाठी योगाअभ्यासासंबंधी विविध व्याख्याने व प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती.तसेच तिनवीरा व विद्यानगर अलिबाग येथील मुलांसाठी योगाभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. भक्ती पाटील, वैद्यकीय    समन्वय्क, राजीव गांधी जीवनदायी योजना यांनी बौद्धीक विकासासाठी योग या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच 19 जून 2017 रोजी केळवणे येथे योगमार्गदर्शक व आयुष मोफत  निदान व उपचार शिबीराचे आयोजन जि.प.सदस्य् श्री. ज्ञानेश्वर घरत योनी केले होते.
             या शिबीरात डॉ.वैशाली पाटील यांनी आयुर्वेद व डॉ. रश्मी गंभीर यांनी होमिओपॅथीद्वारे उपस्थित रुग्णांना उपचार दिले.व्याधीनुसार कोणकोणती योगासने उपयुक्त ठरतील यांचे मार्गदर्शन श्री. दामोदर पाटील व सौ.सीमा रेजा यांनी केले.डॉ.अर्चिस पाटील यांनी जि.सा.रु.अलिबाग येथील परिचर्या विद्यार्थ्यांना गर्भावस्था व योग याबद्दल मार्गदर्शन केले.
दिनांक  20 जून 2017 रोजी ज्येष्ठ  नागरिक संस्था, अलिबाग येथील सभासदांसाठी डॉ.रश्मी गंभीर यांनी वार्धक्य् अवस्थेतील योग या विषयावर प्रबोधन केले. डॉ.चेतना पाटील व सौ.सीमा रेजा यांनी करवून घेतलेल्या ध्यानधारणा व प्राणायामाच्या प्रात्यक्षिकास सभासदांनी उत्स्फुरर्तपणे प्रतिसाद दिला.
जिल्हा कारागृह येथे आज दिनांक 21 जून 2017 रोजी सकाळी 8.30 वाजता योग दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेथील कारागृहातील काम करणारे अधिकारी, कर्मचारी,कैदी यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला.नैराश्यावर मात करणे व सकारात्मक दृष्टीकोनाचा अवलंब करण्यासाठी योगाभ्यास या विषयावर श्रीम.स्मिता देवळे व श्री.दामोदर पाटील यांनी प्रात्यक्षिकांद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले.
योग जनजागृती अभियानांतर्गत योग या संबंधीचे चित्रमय प्रदर्शन जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील परिचर्या विद्यार्थ्यांनी सादर केले.
डॉ.चेतना पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवर, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड