रायगड जिल्ह्यात मनाई आदेश जारी

रायगड जिल्ह्यात मनाई आदेश जारी
   अलिबाग दि.19, (जिमाका) :- रायगड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत (पोलीस आयुक्तालयाचे क्षेत्र वगळून) दिनांक 15 जून 2017 रोजी सकाळी 8.00 पासून ते 28 जून  2017 रात्रौ 24.00 वाजेपर्यंत कोणत्याही जमावास किंवा मिरवणुकीस अधिसूचनेद्वारे मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.
दि. 26 जून 2017 रोजी  मुस्लीमबांधवांचा रमजान ईद हा सण साजरा होणार आहे. तसेच खोपोली पोलीस ठाणे हद्दीत खोपोली नगरपरिषद चतुर्थ श्रेणी वसाहत,जुना मच्छिमार्केट इंदिरानगर येथील राहणाऱ्या श्रीम. अलका विलास भालेराव, व इतर 22 महिला यांनी जातीयवादी समाजकंटकांकडून चालू असलेल्या दहशतवादामुळे दलित बौद्ध समाजातील महिला मुलींची अब्रु धोक्यात असून त्यांच्या जिवीतास धोका असल्याने संबंधीतांवर योग्यती  कारवाई करावी अन्यथा दिनांक 21 जून 2017 रोजी पासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा पटांगण खोपोली येथे आमरण उपोषण करणार असल्याबाबत कळविले आहे.
तसचे वडखळ पोलीस ठाणे हद्दीतील श्री.प्रफुल्ल्‍ विठोबा म्हात्रे, उपसभापती कृषी उत्पन्न्‍ बाजार समिती पेण,श्री.जयप्रकाश ठाकूर व श्री.संदेश ठाकूर यांनी जे.एस.डब्ल्यू स्टिल लि.डोलवी यांना पत्रान्वये कळविले आहे की,स्टिल उत्पादीत कंपनीच्या झोतभट्टयांनी वाशी विभागात तिव्र उष्णता वाढली आहे.कंपनीने सुरु केलेल्या कोक प्लॅटंमधून उत्सर्जित होणाऱ्या   कार्बनडायऑक्साईड  विषारी वायुमुळे होणारे वायुप्रदुषण,प्रकल्पातून हवेत मिसळणारे डस्ट् यामुळे हवा प्रदुषीत होऊन वाशी विभागात प्रदुषणाचा जोरदार फैलाव  झाला आहे. जनतेच्या जिवावर बेतणाऱ्या प्रदुषणाला विरोध करण्यासाठी जे.एस.डब्ल्यू कंपनी वडखळ यांचे विरोधात अर्जदार व त्यांचे सहकारी लवकरच जनआंदोलन करणार असल्याचे कळविले आहे.
  कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी रायगड-अलिबाग यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3)  अन्वये  असलेल्या प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन मनाई आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार पुढील कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे.
शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, बंदुका, सुरे, काठया किंवा लाठ्या अगर शारीरिक दुखापत करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही तत्सम वस्तू बाळगणे.  अंग भाजून टाकणारा पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे. दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमाकरणे किंवा तयार करणे,  सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा देणे किंवा गाणे म्हणणे किंवा वाजविणे.  व्यक्ती, प्रेत, आकृत्या यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे,  सभ्यता अगर निती या विरुध्द असतील अशी जिल्ह्याची शांतता धोक्यात आणतील किंवा ज्यामुळे राज्यशासन उलथून पाडण्याचा संभव आहे अशी आवेशपूर्ण भाषणे किंवा हावभाव करणे किंवा सोंग करणे, चित्र, चिन्हे अगर कोणतीही तत्सम वस्तू, जिन्नस तयार करणे किंवा लोकांत प्रसार करणे.   ज्यांना वरिष्ठांच्या आदेशानुसार किंवा  कर्तव्यपूर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे अशा शासकीय अधिकाऱ्यांना अशी हत्यारे योग्य रितीने बाळगण्यासाठी अगर ठेवून घेण्यासाठी लागू नाही. पूर्व परवानगी  शिवाय पाच अगर पाचहून अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास किंवा मिरवणूकीस मनाई करण्यात आली आहे.  ही अधिसूचना खऱ्या प्रेतयात्रेसाठी, अंत्यविधीच्या जमावास अगर धार्मिक समारंभासाठी, शासकीय समारंभासाठी लागू नाही.

या कालावधीत होणारे उत्सव, सभा, मिरवणुका इत्यादी कार्यक्रमास परवानगी देण्याचे अधिकार संबधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना देण्यात आले आहेत. 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक