शेत जमीन विकण्यासंबंधी जमीन मालकांना आवाहन

शेत जमीन विकण्यासंबंधी जमीन मालकांना आवाहन
            अलिबाग दि.20 (जिमाका):-  सामाजिक न्याय विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील दारिद्रय रेषेखालील भूमिहिन शेतमजुरांना  शेतजमीन उपलब्ध करुन देण्याकरीता कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण  व स्वाभीमान योजना राबविली जात आहे.
ज्या जमीन मालकांना त्यांचेकडील कसण्यास योग्य असलेली जमीन विकावयाची असेल, त्यांनी संबंधित जिल्हयाचे प्रादेशिक उपायुक्त किंवा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे साध्या कागदावर अर्ज करावा.
ठळक अटी:-जमीन मालकी बाबतचा सातबारा, जमीनीवरती कसल्याही प्रकारचे कर्ज नसावे.,जमीन शासकीय दर (रेडी रेकनर) प्रमाणे खरेदी करण्यात येते., खरेदी किंमत जास्तीत जास्त  रु.3.00 लक्ष प्रती एकर राहील.असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,रायगड अलिबाग यांनी प्रसिद्घी पत्रकान्वये कळविले आहे.

000000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक