तळा तालुक्यातील मौजे गिरणे येथील नवीन आरोग्य उपकेंद्रासाठी जागा हस्तांतरित

 


 

अलिबाग, जि.रायगड दि.10 (जिमाका):- तळा तालुक्यातील मौजे गिरणे येथील नवीन आरोग्य उपकेंद्र इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष घालून संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.

     या पार्श्वभूमीवर मौजे गिरणे ता.तळा येथील गट नं.116 एकूण क्षेत्र 0.08.00 हे.आर. पैकी 0.05.00 हे.आर. जमीन महसूल  मुक्त व सारामाफीने जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे नवीन आरोग्य उपकेंद्र गिरणे, ता.तळा करिता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत.

तळा तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने ही बाब जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाची आहे. 

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक