युथ हॉस्टेल राष्ट्रीय गोवा सायकल मोहिमेचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी सायकलींग करुन केला शुभारंभ



अलिबाग, जि. रायगड, दि.13 (जिमाका)- युथ हॉस्टेल असोसिएशन इंडिया नवी दिल्ली आयोजित राष्ट्रीय गोवा सायकलींग मोहिमेचा शुभारंभ रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूयर्वंशी यांनी शुक्रवारी सकाळी वरसोली येथील कवळे कॉटेज मधून स्वतः सायकलींग करुन केला.
देशातील जम्मू-काश्मिर, मेघालय, अरुणाचलप्रदेश, गुजराथ, महाराष्ट्र, कर्नाटक,हरियाणा, झारखंड, आदि एकूण 12 राज्यातील 40 सायकलीस्ट या मोहिमेत सहभागी झाले आहेत. या मध्ये 4 महिला सायकलीस्टचा देखील समावेश आहे. कोकणच्या सागरी किनारपट्टीतून गोव्याला जाणाऱ्या या नऊ दिवसांच्या या मोहिमेचे नेतृत्व गुजराथ राज्यातील पहिली महिला विक्रमविर कन्या वृषाली पुरोहीत ही करीत असून कार्यक्रम अधिकारी एस.शैलेश हे आहेत.
युथ हॉस्टेल चळवळ ही देशातील युवकांना जोडणारी चळवळ असून, अलिबाग मध्ये युथ हॉस्टेलच्या उभारणी करीता जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती जागा उपलब्ध करुन दिली जाईल, असा विश्वास डॉ.सूर्यवंशी यांनी बोलताना व्यक्त केला. रायगड जिल्ह्यास असलेल्यातिहासिक पार्श्वभूमीचा विचार करुन रायगड जिल्हा पयर्टन दृष्ट्या विकसित करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाचा असल्याचे डॉ.सूर्यवंशी यांनी अखेरीस सांगीतले.
    यावेळी युथ हॉस्टेल राष्ट्रीय पर्यावरण संरक्षण समीतीचे सदस्य तथा अलिबाग यूथ हॉस्टेलचे कार्याध्यक्ष जयंत धुळप, महाराष्ट्र राज्य यूथ हॉस्टेलचे प्रभारी अध्यक्ष गिर्यारोहक रमेश किणी, अलिबाग युथ हॉस्टेलचे सचिव संचिन क्षिरसागर, मोहिमेच्या स्थानिक संयोजक युथ हॉस्टेलरभा धुळप, संतोष कवळे आदि मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान गुरुवारी संध्याकाळी अलिबाग यूथ हॉस्टेल अलिबागचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे यांनी सर्व सायकलीस्टचे अलिबाग येथे स्वागत करुन मोहीमेच्या मागार्वरील एतिहासिक किल्ले आणितिहास या बाबत संवाद साधला. सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या वंशजां बरोबर थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याने सर्व सायकलीस्ट सुखावून गेले होते.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक