महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन



अलिबाग दि.11, रायगड जिल्ह्यामध्ये  गुरुवार दिनांक 12 डिसेंबर 2019 रोजी वैश्विक आरोग्य संरक्षक दिवसाचे औचित्य  साधून महात्मा गांधी मिशन हॉस्पिटल कामोठे व महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज हॉस्पिटल फॉर वुमन्स अँड चिल्ड्रन्स यांच्या विद्यमाने जिल्ह्यात ग्रांमपंचायत कार्यालय, वलप, ता.पनवेल, जिल्हा रायगड या ठिकाणी सकाळी नऊ ते पाच वाजता या दरम्यान महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान  भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत आरोग्य योजने अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिरात तज्ञ  डॉक्टर्स तपासणी करुन महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेच्या व आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य  योजनेच्या लाभार्थी रुग्णांवर आवश्य्क शस्त्रक्रिया,कर्करोग, मुत्रपिंड व मुत्रमार्ग विकार,पोटाचे आजार, मेंदू व मज्जासंस्था विकार, स्त्रीरोग, अस्थिव्यंग, सर्जरी, जठर व आतडे शस्त्रक्रिया,त्वचारोग, नेत्र शस्त्रक्रिया मोतीबिंदू वगळून, कान नाक घसा तपासणी करण्यात येईल.
या शिबीरामध्ये व्याधी निदान झाल्यास योजनेच्या मान्यताप्राप्त  रुग्णालयामध्ये ज्यांचे उत्पन्न एक लाख पेक्षा कमी असेल अशा कुटूंबाचा दारिद्रय रेषाखालील पिवळया शिधापत्रिका धारक, केशरी शिधापत्रीका धारक,  अंत्योदया  शिधापत्रिकाधारक यांचा समावेश असेल.
तरी या शिबीराचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा.असे आवाहन डॉ. अजित गवळी,जिल्हा शल्य चिकित्सक रायगड, डॉ.सुधाकर मोरे,जिल्हा आरोग्य अधिकारी रायगड व जिल्हा समन्वयक डॉ.रविंद्र जगतकर, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना रायगड यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक