माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या लाभार्थ्यांना मुदत ठेव प्रमाणपत्राचे वाटप




अलिबाग, जि. रायगड, दि.13 (जिमाका)-महिला व बालकल्याण विभाग रायगड जिल्हा परिषद या विभागाची माझी कन्या भाग्यश्री या योजनेमधील  जिल्ह्यातील एकूण 110 लाभार्थ्यांना रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आस्वाद पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, सभापती श्रीम.उमा मुंडे, सदस्य चित्राताई पाटील, प्रियदर्शनी पाटील, मानसी दळवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बा.क.नितिन मंडलिक या मान्यवरांच्या हस्ते मुदत ठेव प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. 
            या कार्यक्रमाचे नियोजन महिला व बाल कल्याण विभागाच्या विस्तार अधिकारी (सांख्यिकी) श्रीम.रंजिता थळे,प्रकल्प विस्तार अधिकारी (सांख्यिकी) श्रीम.अपर्णा शिंदे यांनी केले.  कार्यक्रमाचे सूत्र संचलन बालविकास प्रकल्प अधिकारी राजन सांबरे यांनी केले.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड