मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण 25 पर्यंत अर्ज मागितले



अलिबाग, जि. रायगड, दि.13 (जिमाका)-  मत्स्यव्यवसाय विभागामार्फत सहा महिने मुदतीचे सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षणाचे 110 वे सत्र दि.01 जानेवारी 2020 पासून मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, रायगड-अलिबाग येथे होणार आहे.  त्यासाठी मच्छिमार युवकांकडून 25 डिसेंबर पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.  या प्रशिक्षणचा कालावधी 01 जानेवारी ते 30 जून 2020 (6 महिने).  त्यासाठी  आवश्यक पात्रता याप्रमाणे : उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष.  (आधारकार्ड व रेशनकार्ड छायाप्रत जोडावी), उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक. (शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाप्रत जोडावी). क्रियाशील मच्छिमार व किमान एक वर्ष मासेमारीचा अनुभव असावा.  (विहित नमुन्यातील अर्जावर मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस घ्यावी),  उमेदवारास पोहता येणे  आवश्यक.    प्रशिक्षण शुल्क : प्रतिमाह 450/- प्रमाणे सहा महिन्यांचे रु. 2700/- मात्र.  दारिद्रय रेषेखालील असल्यास प्रतिमाह 100/- प्रमाणे सहा महिन्यांचे रु.600/- मात्र. (दारिद्रय रेषेखालील उत्पन्नाचा गटविकास अधिकारी यांचा दाखला जोडावा)  रोजगार  स्वयंरोजगाराच्या संधी : राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) अंतर्गत योजनेतून अर्थसहाय्य घेऊन मच्छिमार नौका बांधता येते.  कस्टम विभाग, नेव्हल डॉक, महाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड, सागरी पोलीस, मत्स्य महाविद्यालय इ.विभागाच्या सागरी नौकांवर पात्रतेनुसार खलाशी म्हणून रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते.  संपर्क : रत्नाकर प्रभाकर राजम, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, रायगड-अलिबाग जुन्या मच्छिमार्केट समोर अलिबाग (ई-मेल ftoalibag@rediffmail.com) मो.9421264438.  इच्छुक युवकांनी स्वत:चे हस्ताक्षरात भरलेला विहित नमुन्यातील अर्ज दि. 25 डिसेंबर पर्यंत कार्यालयीन वेळेत कामकाजाचे दिवशी सादर करावेत, असे मत्स्यव्यसाय प्रशिक्षण अधिकारी रत्नाकर प्रभाकर राजम यांनी कळविले आहे.
  00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड