राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन



अलिबाग दि.11, भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राम मोहन रॉय ग्रंथालय  प्रतिष्ठान, कोलकत्ता यांच्या असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या सर्वांगिण विकासासाठी अर्थ सहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मार्फत राबविण्यात येतात. या असमान निधी योजनेंबाबत नियम अटी व अर्जाचा नमुना राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राज्यातील इच्छुक शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना सदर संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावा.
सन 2019-20 साठीच्या असमान निधी योजना पुढीलप्रमाणे आहेत.
 (Non Matching Schemes)
 1.)ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थाना ग्रंथ, साधन सामग्री,फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य.,2.) राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा,विकसित करण्यासाठी अर्थ सहाय्य.,3)महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थ सहाय्य,4.) राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थ सहाय्य,5)बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय बाल कोपरा स्थापन करण्याकरीता अर्थसहाय्य.
तरी ग्रंथालयांनी वरीलपैकी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहीत मार्गाने व मुदतीत आवश्य्क कागदपत्रांसह इंग्रजी, हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी रायगड अलिबाग यांच्या कार्यालयात  शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर,2019 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन सुभाष हि. राठोड, प्र.ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई यांनी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक