सुधारीत वृत्त:मान्सून पर्यटक मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजनां ट्रेकींगसाठी नाव नोंदणी बंधनकारक



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4- मान्सूल पर्यटकांच्या कर्जत व खालापूर तालुक्यातील विविध धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटक येत असतात.  या ठिकाणी अपघात होऊन पर्यटकांच्या मृत्यू होण्याच्या घटना मागील वर्षी मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मान्सून 2018 मधील येणाऱ्या पावसाळ्यामध्ये पर्यटकांचे मृत्यू रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली . आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून बचाव साहित्य व सूचना फलक लावण्यात यावेत. होमगार्ड, संयुक्त वन व्यवस्थापन समिती,जीवरक्षक नेमण्यात यावेत. अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिल्या. तसेच वन विभागाकडून प्रबळगड,पेठकिल्ला,इशाळगड या गड,किल्ल्यांवर जाण्यासाठी पर्यटकांची नोदणी करण्याच्या सूचना देखील दिल्या. या गडांवर जाण्याकरीता स्थानिक युवकांना गाईड म्हणून प्रशिक्षित करुन त्यांच्यासोबत ट्रेकिंगसाठी जाण्यासाठी नाव नोंदणी बंधनकारक करण्यात येणार आहे.
            यामध्ये पर्यटकांनी निसर्गाचा आनंद  मनसोक्त घ्यावा. मद्यपान करुन  धबधब्याच्या ठिकाणी जावून स्वताचा जीव धोक्यात घालू  नये. त्यामुळे जीवीत हानी टाळण्याच्या दृष्टीने धबधब्याच्या ठिकाणी मद्यपान करण्यात प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच यावर्षी पोलीस बंदोबस्तामध्येही वाढ करण्याचा ‍निर्णय घेण्यात आला आहे. जे लोक धबधब्याच्या ठिकाणी व परिसरामध्ये मद्य विक्री किंवा उपलब्ध् करुन देतील त्यांच्यावरही कार्यवाही करण्यात येणार आहे. पोलीस विभाग,राज्य उत्पादन शुल्क विभाग,वन विभाग, महसूल विभाग यांच्या संयुक्त पथकाद्वारे धबधब्याच्या ठिकाणी तपासणी करण्यात येणार आहे. वाहतूक पोलीस विभागाकडून धबधब्याच्या ठिकाणी मद्यपान करणाऱ्या व्यक्तीची तपाणीसणी करण्यात येणार आहे. तरी पावसाळ्यात पर्यटकांचे मृत्यू रोखण्यासाठी वरील उपाययोजनेस सहकार्य करावे.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, रायगड अलिबाग यांनी केले आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड