सुधागड तालुक्यातील तलाठी,मंडळ अधिकारी कार्यालय इमारतीच्या बांधकामासाठी जागा हस्तांतरित

 


 

अलिबाग,जि.रायगड, दि.19 (जिमाका) :- सुधागड तालुक्यातील दुर्गम, डोंगराळ व आदिवासी बहुल भागात मंडळ अधिकारी व तलाठी सजे यांना स्वत:चे कार्यालय उपलब्ध नसल्याने सामान्य नागरिकांना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध होत नव्हत्या. त्यामुळे सुधागड तालुक्यातील नांदगांव, नवघर, परळी, हेदवली, वाघोशी, सिध्देश्वर बु., चिवे, माणगाव बु.  या गावांच्या संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांनी तलाठी/मंडळ अधिकारी, तलाठी सजा कार्यालयाच्या इमारतींच्या बांधकामासाठी शासकीय जमिनीची मागणी केली होती.

              शासकीय कार्यालयांची स्वत:ची इमारती असावी, जेणेकरुन जनतेला योग्य सोयी-सुविधा गतीने पुरविता येतील, या उद्देशाने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या विषयाचा पाठपुरावा करुन जिल्हा प्रशासनास त्याप्रमाणे निर्देश दिले.

            त्यानुषंगाने नांदगांव, नवघर, हेदवली, सिध्देश्वर बु. या गावांमध्ये प्रत्येकी 0.05.0 हेक्टर आर जमीन तर परळी, वाघोशी, चिवे या गावांमध्ये प्रत्येकी 0.02.0 हेक्टर आर जमीन आणि अशाच प्रकारे माणगाव बु. या गावामध्ये 525 चौरस फूट जमीन हस्तांतरित करण्याविषयीचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पारित केले आहेत.

              या निर्णयामुळे सुधागड तालुक्यातील नागरिकांना शासकीय सोयी-सुविधा मिळण्यासाठी निश्चितच गती प्राप्त होईल. शासकीय कार्यालयांसाठी स्वतःची शासकीय वास्तू असावी, यासाठी गेल्या काही महिन्यांपासून पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जातीने लक्ष देऊन अनेक शासकीय कार्यालयांचे प्रश्न मार्गी लावले आहेत.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक