रायगड महासंस्कृती महोत्सव-2024 चे 12 ते 16 फेब्रुवारी दरम्यान आयोजन महोत्सवास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-- जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे



 

रायगड(जिमाका)दि.9:- सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आणि रायगड जिल्हा प्रशासन आयोजित रायगड महासंस्कृती महोत्सव-2024 चे दि.12 फेब्रुवारी ते दि.16 फेब्रुवारी या कालावधीत सायंकाळी 4 ते रात्रौ 10 वाजेपर्यंत पोलीस परेड मैदान अलिबाग येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  या महोत्सवास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी केले आहे.

आगरी, कोळी संस्कृतीसह विविध लोककला याबरोबरच विशेष निमंत्रितांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन दि.12 फेब्रुवारी रोजी उद्योग मंत्री तथा पालकमंत्री श्री.उदय सामंत आणि महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. सायंकाळी 4 ते 6 यावेळेत अलिबाग येथील स्थानिक कलाकारांचा शिवकालीन संस्कृती दर्शविणारा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये मर्दानी खेळ, पोवाडे यांचा समावेश आहे. तर सायंकाळी 7 ते रात्रौ 10 या वेळेत अवधूत गुप्ते यांचा संगीत रजनी कार्यक्रम होणार आहे.

दि.13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 ते 6 यावेळेत अलिबाग येथील स्थानिक कलाकारांचा कोळी संस्कृती दर्शविणारा कार्यक्रम होणार आहे. तर सायंकाळी 7 ते रात्रौ 10 या वेळेत अशोक हांडे यांचा मराठी बाणा कार्यक्रम होणार आहे.  दि.14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 ते 6 यावेळेत पारंपारिक लोकनृत्य कार्यक्रम होणार आहे. तर सायंकाळी 7 ते रात्रौ 10 या वेळेत नंदेश उमप यांचा महाराष्ट्राची संस्कृती कार्यक्रम होणार आहे. दि.15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 ते 6 यावेळेत स्थानिक कलावंताचा दशावतार कार्यक्रम होणार आहे. तर सायंकाळी 7 ते रात्रौ 10 या वेळेत रत्नकांत जगताप यांचा महाराष्ट्राची लोकधार संगीत रजनी  कार्यक्रम होणार आहे. 

दि.16 फेब्रुवारी रोजी  सायंकाळी 4 ते 6 यावेळेत स्थानिक कलावंताचा आगरी संस्कृतीचे दर्शन घडविणारा कार्यक्रम होणार आहे. तर सायंकाळी 7 ते रात्रौ 10 या वेळेत महानाट्य शिवबा होणार आहे.

या महोत्सवात विविध प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 1) पेण येथील श्री गणेश मूर्तीकार यांनी घडविलेल्या गणेशमूर्तीचे प्रदर्शन.2) शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, 3) शिवदुर्ग  प्रदर्शन,4) स्थानिक बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादन दालन तसेच खाद्यपदार्थ दालन यामध्ये वारली कला, कोकण मेवा, दगडी वस्तू, मातीची भांडी, नारळापासून बनविलेले विविध कलाकुसर वस्तू, स्थानिक मसाले, बांबूपासून तयार केलेल्या वस्तू तसेच कृषी प्रक्रीया आधारित विविध दालन. या महोत्सवात 50 बचतगट सहभागी होणार आहेत.

सर्वांना मोफत प्रवेश आहे.

तरी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे व या सांस्कृतिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड