पनवेल तालुक्यातील अनाधिकृत शाळा घोषित

 

        

रायगड(जिमाका)दि.5:- पनवेल तालुक्यामध्ये शासनाची मान्यता न घेता काही सस्थांनी प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरु केल्या आहेत, या शाळांमध्ये कोणीही आपल्या मुलांचा प्रवेश घेऊ नये, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती पनवेल एस.आर.मोहिते यांनी केले आहे.  

वास्तविक पाहता शाळा सुरु करण्यापूर्वी संस्थांनी शासनाची मान्यता घेणे आवश्यक आहे. मात्र सोबत दिलेल्या यादीतील शाळांनी शासनाची मान्यता घेतलेली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाकडून या शाळा अनधिकृत शाळा म्हणून घोषित करण्यात येत आहेत. तसेच या सर्व शाळांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

  अनधिकृत शाळा प्राथमिक :- मुंबई विभाग- मार्शमेलोज इंटरनॅशनल स्कूल, ओवे,नॉलेज अॅन्ड सिफटेल ओवे. केळसेकर इंग्लिश मिडीयम स्कूल, त पाचनंद, पिस एज्युकेशन टेस्ट कुर्ला, ठाणे.  अर्कम इंग्लिश स्कूल, तळोजा,अलहमद  चॅरीटेबल ट्रस्ट.  ओसीन ब्राईट कॉन्व्हेट हाय तळोजा, एज्युकेअर अॅन्ड वेल्फेअर सोसायटी तळोजा.  ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूल कळंबोली, ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूल कळंबोली.  सेंट जोहान्स इंटरनॅशनल स्कूल कोळखे, डिस्पेस ऑफ बिलीव्हर ट्रस्ट. साई गणेश एज्युकेशन सोसायटीची लाटे विनायक केशव जोशी मेमोरियल नवजीवन इंटरनॅशनल स्कूल टोलनाका,साई गणेश एज्युकेशन सोसायटीची लाटे विनायक केशव जोशी मेमोरियल नवजीवन इंटरनॅशनल स्कूल कर्नाळा नाका. रोहिजण इंग्लिश स्कूल रोहिजण, साखरे एज्युकेशन सोसायटी कळंबोली. आकृती एज्युकेशन अॅन्ड वेलफेअर सी एस एम बी इंटरनॅशनल स्कूल, उलवे, आकृती एज्युकेशनल अॅन्ड वेलफेअर सोसायटी. डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल स्कूल CBSE, महात्मा ज्योतिबा फुले परिवर्तन संस्था. बजाज इंटरनॅशनल स्कूल तळोजा, ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट तळोजा. प्लीजन्ट इंग्लिश स्कूल नेरेपाडा, लेट पंढरीनाथ खुटले शैक्षणिक संस्था नेरेपाडा. न्यु इंग्लिश स्कुल नेरे,मा.आमदार दत्तुशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळ. एस.एम.बी इंटरनॅशनल स्कूल त. पाचनंद, आकृती एज्युकेशनल अॅन्ड बेलफेअर सोसायटी. दि वेस्ट हील्स इटरनॅशनल स्कूल त. पाचनंद, दि व्हीस्ट हिल्स ट्रस्ट. लिटील जीनीयस स्कूल, त. पाचनंद,खैरुन्नीसाबी एज्युकेशनल अॅन्ड बेलफेअर ट्रस्ट, त.पाचनंद. ब्राइट इंटरनॅशनल स्कूल, त.पाचनंद, गोविंदशेट केणी शिक्षक प्रसारक संस्था तळोजा. टीनी लॅन्ड स्कूल, रोहिंजण. ब्राइट इंटरनॅशनल स्कूल, रोहिजण, गोविंदशेट केणी शिक्षक प्रसारक संस्था तळोजा. माय छोटा स्कूल, तळोजा,चिल्ड्रन एज्युकेशन ट्रस्ट, पालघर. सेंट अॅन्ड्रयुज स्कुल इंटरनॅशनल स्कूल ॲन्ड ज्यु कॉलेज वाकडी, श्री. ज्ञानेश्वर माऊली शिक्षण संस्था. किड्स गार्डन पब्लिक स्कूल, टेमघर, श्रीविद्यावर्धिनी चॅरीटेबल ट्रस्ट. कोठारी स्कुल करंजाडे, कोटारी प्रोडक्शन मुंबई

अनधिकृत शाळा माध्यमिक :- मुंबई विभाग- दि बुद्धीष्ट इंटरनॅशनल स्कूल, करंजाडे, पंचशिल बहुउद्देशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद. गोयंका इंटरनॅशनल स्कूल, उलवा, स्वामी विवेकानंद ट्रस्ट मुंबई, कै. मंजुळा त्रिबक (साखरेशेठ) ठाकूर इंग्रजी माध्यम शाळा- पाले- बुद्रुक, कोळवाडी, ता.पनवेल, पडघे विभागीय शिक्षक संस्था, पाले बुद्रुक. एज्यु टेक स्कूल (माध्यमिक) तळोजे पाचनंद, मुन एज्युकेशन वेल्फेअर ट्रस्ट तळोजा. न्यु इंग्लिश स्कुल कोपरा, हनुमान ग्रामविकास मंडळ, कोपरा. ज्ञानाई माध्यमिक विद्यालय धामणी वाजे, ए.डी. कोळी शिक्षण प्रसारक संस्था, धामणी. मुंबई सेंट विल्फेड स्कूल से-२, सेंट विल्फेड एज्युकेशन सोसायटी मिरा रोड.

अनधिकृत शाळा सन 2023-24 मध्ये बंद झालेल्या परंतु पुन्हा सुरु होण्याची शक्यता असलेल्या शाळा :- वेद गृह इंटरनॅशन स्कुल करंजाडे. डॉल्फीन किड्स स्कूल, से. प्लॉट नं. 59. के.डी शेल्टर, करंजाडे ता.पनवेल, सहयाद्री एज्युकेशन सोसायटी, से-4, करंजाडे. एस जी टी इंटरनॅशनल स्कूल, करंजाडे, एस जी टी एज्युकेशनल ट्रस्ट, से-22, नौपाडा. प्लीजन्ट इंग्लिश स्कूल सांगडे, लेट पंढरीनाथ माया खुटले एज्युकेशन अॅन्ड सोशल ट्रस्ट, सांगडे. लिटील चॅम्प ओवळे, साई सिद्धी शैक्षणिक संस्था ओवळे. दि इंग्लिश स्कूल, उलवा, प्रोग्रेसीव्ह शैक्षणिक व सामाजिक संस्था. रायगड इंटरनॅशनल स्कूल, त.पाचनंद.

अनधिकृत शाळा म्हणून घोषित केलेल्या शाळेत पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेतला व भविष्यात मुलांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक