एच.आय.व्ही. एड्स व लैंगिक आजाराबाबत लोककलेतून प्रिझम संस्थेच्या कलाकारांनी केली अलिबागमध्ये जनजागृती

 

रायगड(जिमाका)दि.10:-  जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय,रायगड अंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ.अंबादास देवमाने यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक अलिबाग व जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग या ठिकाणी  एचआयव्ही एड्स व लैंगिक आजाराबाबत लोककलेचा माध्यमातून प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या वतीने जनजागृती करण्यात आली.

स्थलांतरित कामगार व स्थानिक युवकांना, नागरीकांना लैंगिक आजाराबाबतचे सविस्तर मार्गदर्शन तसेच एचआयव्हीची लागण महत्त्वाचा चार कारणांमुळे होते जसे एचआयव्ही व्यक्तीसोबत असुरक्षित लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याने, एच आय व्ही व्यक्तीची सुई व सिरिंज चा वापर केल्याने, एचआयव्ही गर्भवती मातेपासून होणाऱ्या बाळाला लागण होते. तसेच रक्त पेढीतुन एच आय व्ही मुक्त रक्त न घेतल्या मुळे एचआयव्ही ची लागण होऊ शकते. म्हणून प्रत्येक नागरिकांनी शासकीय दवाखान्यातील समुपदेशन व तपासणी केंद्रातून एचआयव्हीची तपासणी करणे आवश्यक आहे, असे कलाकारांनी आपल्या पथनाट्यातून सांगितले. त्याचबरोबर लैंगिक आजरा विषयी काही शंका असल्यास शासकीय टोल फ्री क्रमांक 1097 या टोल फ्री नंबर वर कॉल करुन माहीत मिळवावी हे देखील पथनाट्य द्वारे सांगण्यात आले.

या पथनाट्याचे नेतृत्व प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी गोंधळी यांनी केले तर कलाकार म्हणून नेहा पाटील, अथर्व भगत, स्वराज वाटकरे, कृतिका पाटील, विपुल पाटील, तुषार राऊळ, साक्षी मगर, स्वराज कोंडगुळी, स्मित पाटील,मनाली पाटील आदि कलाकार सहभागी झाले होते.

या कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने, जिल्हा सहा. लेखा रवींद्र कदम, जिल्हा सहा. एम.अण्ड ई. रश्मी सुंकले, जिल्हा सहा कार्यक्रम संपदा मळेकर, डापकू अधिकारी व कर्मचारी मोबाईल आयसीटीसी व्हॅन समुपदेशक रामेश्वर मुळे, प्रयोग शाळा तंत्रज्ञ गणेश सुतार, वाहनचालक अतिष नाईक, क्लिनर रूपेश पाटील यांसह जनसमुदाय उपस्थित होता.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड