मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिचंन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे कोकण विभागासाठी वरदान

 

    

रायगड(जिमाका)दि.8:- राज्याच्या विविध भागात पावसाचे होणारे असमान वितरण आणि पावसातील अनिश्चित येणारे खंड या नैसर्गिक अडचणीमुळे सिंचनाअभावी पिक उत्पादनातील घट टाळण्यासाठी पावसाचे पाणी साठविण्यासाठी शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिचंन योजनेचा विस्तार करून या योजनेमध्ये वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश केला आहे. कोकण विभागासाठी एकूण 855 लक्षांक असून यामध्ये ठाणे -125, पालघर-120, रायगड-210, रत्नागिरी-210, सिंधुदुर्ग-190 शेततळयांचा समावेश आहे.

लाभार्थीसाठी पात्रता पुढीलप्रमाणे :- अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर किमान 0.20 हेक्टर जमीन आवश्यक आहे, क्षेत्रधारणेस कमाल मर्यादा नाही, अर्जदार शेतकऱ्यांची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक राहील, अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकाकरीता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

लाभार्थी निवड :- महाडीबीटी पोर्टलवर (mahadbtmahait.gov) मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिचंन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकासाठी अर्जाद्वारे लाभार्थी निवड होते.

शेततळ्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिचंन योजनेंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी किमान 23 हजार 881 ते कमाल रक्कम रुपये 75 हजार रकमेच्या मर्यादेत अनुदान आकारमान निहाय देय राहील.

कोकण विभागातील किनाऱ्यालगतचे खार जमीन क्षेत्रासाठी 2.00 मीटर खोलीच्या शेततळ्यांच्या आकारमानास विशेष बाब म्हणून मंजुरी दिली आहे. खोदकामाच्या प्रमाणात परिमाणाचौ गणना करुन देय अनुदान परिमाणाच्या प्रमाणात देण्यात येणार आहे.

कोकण विभागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक कोकण विभाग ठाणे अंकुश माने यांनी केले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक