*मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण योजनेचा दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा*

                                                                       

अलिबाग, जि.रायगड, दि.5 (जिमाका)- महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कार्यरत "शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह" ही संस्था प्रौढ दिव्यांगासाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था आहे.    

      या संस्थेतील प्रशिक्षण वर्गांना महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई ची शासन मान्यता आहे. तसेच MSCIT या संगणक प्रशिक्षणासाठी हे अधिकृत प्रशिक्षण केंद्र म्हणून शासन मान्यता आहे. या संस्थेला अखिल भारतीय स्तरावरील FICCI AWARD 1999 प्राप्त झालेला आहे. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणे सुरू आहे.  

       *प्रवेशासाठी नियम, अटी व सवलती :-* अभ्यासक्रमाचे नाव- सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऑपरेशन विथ एम.एस. ऑफीस (संगणक कोर्स), शैक्षणिक पात्रता- किमान इयत्ता 8 वी पास.   मोटार अँण्ड आर्मचेअर रिवायडींग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज, (इलेक्ट्रिक कोर्स), शैक्षणिक पात्रता- किमान  इयत्ता 9 वी पास. एम.एस.सी.आय.टी. या संगणक कोर्ससाठी वयोमर्यादा- 16 ते 40 वर्ष, प्रशिक्षण कालावधी-1 वर्ष, 

या प्रशिक्षण वर्गासाठी फक्त  दिव्यांग मुलांनाच प्रवेश दिला जातो. 

       *या प्रशिक्षण योजनेसाठी सोई व  सवलती :-* प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची सोय, अद्ययावत व परिपूर्ण संगणक कार्यशाळा, भरपूर प्रॅक्टिकल्स व व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण, नेटवर्कींग व इंटरनेटची सुविधा, अनुभवी व तज्ञ निदेशक, उज्वल यशाची परंपरा, समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी, व्यवसायासाठी बीज भांडवल योजना.

       *अर्ज केव्हा, कसे व कुठे करावेत :-* प्रवेश अर्ज  व माहितीपत्रक  अधीक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ मिरज, ता. मिरज जि.सांगली पि.नं. 416 410, दूरध्वनी क्र.0233- 2222908, मोबाईल क्र. 7972007456 / 9922577561/ 9975375557 या  पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा समक्ष मोफत मिळतील. प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही.  प्रवेश अर्ज पूर्णपणे भरून फोटोसह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरून द्यावेत.  अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, दिव्यांग असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व आधारकार्ड यांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात प्रवेश अर्ज संस्थेकडे पाठवावेत. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ज्ञ समितीद्वारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्यात येईल.

       तरी गरजू दिव्यांगानी या सूवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी संस्थेशी त्वरित संपर्क साधावा. तसेच ग्रामीण व शहरी भागातील लोकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास ज्ञात असलेल्या गरजू दिव्यांग बांधवांना या शासकीय योजनेची माहिती करून द्यावी, असे आवाहन अधीक्षक, शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, मिरज यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक