विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नवमतदार नोंदणी जनजागृतीकरिता अलिबाग येथे दि.9 नोव्हेंबर रोजी “सायकल रॅली” व “वॉकेथॉन”चे आयोजन

 

अलिबाग, दि.07 (जिमाका):- महाराष्ट्र शासनाच्या निवडणूक विभागांतर्गत दि.9 नोव्हेंबर ते दि.8 डिसेंबर 2022 या कालावधीत नवमतदार नोंदणी होण्याच्या दृष्टीने विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम-2023 अंतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथे बुधवार, दि.9 नोव्हेंबर 2022 रोजी सायकल रॅली आणि वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

ही रॅली दि.9 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथून सुरु होणार असून रॅलीची सांगता अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर होणार आहे.

तरी शाळा/महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थी/खेळाडू यांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर तसेच उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे व जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक