"बकरी ईद"ची सार्वजनिक सुट्टी बुधवार, दि.28 जून ऐवजी गुरुवार, दि.29 जून रोजी जाहीर

 

             अलिबाग,दि.28(जिमाका):- शासनाकडून सन 2023 या वर्षाकरिता जाहीर करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांमधील "बकरी ईद" ची सार्वजनिक सुट्टी बुधवार, दि.28 जून 2023 रोजी दर्शविण्यात आली होती. मात्र हा सण गुरुवार, दि.29 जून 2023 रोजी येत असल्याने दि.28 जून 2023 रोजीची सुट्टी रद्द करुन गुरुवार, दि.29 जून 2023 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाचे सह सचिव सो.ना.बागुल यांनी जाहीर केली आहे.

    तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक