अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत 1 ली इयत्तेत प्रवेशाची सूवर्णसंधी इच्छुकांनी 30 जून 2023 पूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक

 

 

             अलिबाग,दि.28 (जिमाका):- सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

   या प्रवेशासाठीच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे :-

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसुचित जमातीचा असावा, पालकाने विद्यार्थ्यांच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी, या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या मुलाच्या पालकाच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा रुपये 1 लाख इतकी असावी, इ.१ली त प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 6 वर्षे पूर्ण असावे, दि.31 डिसेंबर 2023 पर्यत सहा वर्षे पूर्ण असावे, अर्जासोबत दोन पासपोर्ट फोटो आणि जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्रामसेवकाकडून देण्यात आलेला जन्म दाखला तसेच अंगणवाडी मध्ये प्रवेश घेतला असल्यास अंगणवाडीकडून मिळालेला जन्माचा दाखला जोडण्यात यावा, विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र, आधारकार्ड ची छायांकित प्रत जोडण्यात यावी, विद्यार्थ्याचे पालक शासकीय/ निमशासकीय नोकरदार नसावेत, खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल.
     या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज विनामूल्य वितरित करण्यात येतील.यासाठीची अंतिम मुदत दि.30 जून 2023 आहे.
     निवड केलेल्या विद्यार्थ्याला एकदा शाळा निश्चिती झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पालकांच्या/पाल्यांच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही. परिपूर्ण अर्ज दि. 30 जून 2023 पूर्वी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण, जि.रायगड येथे सादर करावा तसेच अधिक माहितीकरिता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण-रायगड, कृषी उत्पन्न बाजार समिती, पहिला मजला, धरमतर रोड, रायगड बाजार जवळ, पेण, दूरध्वनी क्र. 02143-252519 येथे संपर्क साधावा, असे प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांनी कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक