रायगड जिल्ह्यातील मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील पेण व अलिबाग तालुक्यातील प्रवासी वाहनास बदली वाहन म्हणून नोंदणी करण्यास मान्यता


 

अलिबाग,दि.29 (जिमाका) :- जे.एस.ए.निर्मित ऑटो रिक्षा (तीन चाकी-सहा आसनी) पेट्रोल/सीएनजी या प्रवासी वाहनास परवानगी देण्याबाबतच्या प्रस्तावास मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने सहमती दर्शविली होती व याबाबत शासनाकडून मार्गदर्शन घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यास दि. 05 जून 2023 नुसार शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील पेण व अलिबाग या तालुक्यातील वाहनमालकांनी विक्रम मिनिडोअर तीन चाकी-सहा आसनी हे वाहन निर्लेखित केल्यास त्या बदल्यात ऑटोरिक्षा तीन चाकी-सहा आसनी पेट्रोल/सीएनजी या प्रवासी वाहनास बदली वाहन म्हणून नोंदणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुषंगाने मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण यांच्या कार्यक्षेत्रातील पेण व अलिबाग तालुक्यातील वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी केले आहे.

             मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दि.17 मार्च 2023 रोजी पार पडलेल्या बैठकीमध्ये दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या दि.28 मार्च 2023 रोजी पार पडलेल्या बैठकीत मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने सहमती दर्शविलेल्या प्रस्तावास  दि.05 जून 2023 नुसार शासनाने मान्यता देण्यात आली होती. 

             मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणामध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग व पेण या तालुक्यातील काही गावांचा समावेश होण्यापूर्वी रायगड जिल्ह्यातील रिक्षा व टॅक्सी यांच्या परवानाविषयी धोरण व परवान्यावरील अटी व शर्ती ठरविण्याचे अधिकार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, रायगड यांच्याकडे होते. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील अलिबाग व पेण या तालुक्यातील त्यावेळी नोंदणी झालेल्या रिक्षा व टॅक्सी यांना प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, रायगड यांनी परवान्यावरील अटी व शर्ती निश्चित केल्या आहेत.मात्र कालानुरूप या जिल्ह्यातील अलिबाग व पेण तालुक्यातील काही गावांचा समावेश मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणामध्ये करण्यात आला आहे. आता त्या तालुक्यातील काही गावांचा समावेश मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात करण्यात आल्यामुळे मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या रिक्षा व टॅक्सी संबंधी परवान्याचे धोरण व परवानाविषयी अटी व शर्ती लागू करण्याची बाब प्राधिकरणासमोर सादर करण्यात आली होती. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणामध्ये बहुतांश शहरी भागाचा समावेश आहे व प्रादेशिक परिवहन प्राधिकरण रायगड मध्ये ग्रामीण भागाचा समावेश आहे.

               प्रादेशिक परिवहन प्राधिकरण रायगड यांनी त्या काळात नोंदणी झालेल्या व परवाना देण्यात आलेल्या रिक्षा व टॅक्सी यांना लागू केलेल्या परवान्यावरील अटी व शर्ती या तत्कालीन असल्यामुळे त्यांना मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या अटी पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाहीत. ज्या ऑटोरिक्षा व टॅक्सी वाहनांना त्यांच्या नोंदणीच्या वेळी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, रायगड यांनी परवान्यावरील अटी व शर्ती निर्धारित केल्या असतील त्यांना त्या अटी व शर्ती त्या वाहनांची नोंदणी रद्द संपुष्टात येईपर्यंत लागू राहतील. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील ज्या तालुक्यांचा व त्यातील गावांचा ज्यावेळी मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणामध्ये समावेश झाला असेल तेव्हापासून आणि त्यानंतर नोंदणी होणाऱ्या रिक्षा व टॅक्सी वाहनांना मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने निश्चित केलेल्या परवान्यावरील अटी व शर्ती लागू राहतील. याबाबत प्राधिकरणाने सहमती दर्शवली होती व शासनाकडून मार्गदर्शन घेण्याचे निर्देश प्राधिकरणाने दिले होते. त्यानुसार शासन निर्णयानुसार शासनाने मान्यता दिली आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी दिली आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक