महाज्योती मार्फत जेईई, नीट, एमएचटी-सीईटी प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

 

 

अलिबाग,दि.28(जिमाका) :- महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर मार्फत जेईई, नीट, एमएचटी-सीईटी करिता 10 वी नंतर प्रशिक्षण देण्यात येते.  हे प्रशिक्षण दोन वर्षासाठी असून त्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत टॅब व दररोज 6 जीबी डेटा देण्यात येतो.  10 वी उत्तीर्ण झालेल्या व विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना महाज्योतीच्या जेईईनीट, एमएचटी-सीईटी प्रशिक्षणाचा लाभ होणार आहे. याकरिता महाज्योती संस्थेने इच्छूक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी दि.05 जुलै 2023 पर्यत  मुदतवाढ दिली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा, विद्यार्थी हा इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा, तसेच तो नॉनक्रिमिलेअर गटातील असावा, योजनेच्या संदर्भातील सर्व अटी व शर्ती या महाज्योतीच्या www.mahajyoti.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या असून विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या संकेत स्थळावरील सूचना फलकात जाऊन प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा.

 तसेच ज्या उमेदवारांनी या आधी जेईई, नीट, एमएचटी-सीईटी प्रशिक्षणासाठी अर्ज केले आहेत.  मात्र कागदपत्रांची पूर्तता केली नाही अशा उमेदवारांना त्यांचे आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी दि.15 जुलै 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ज्या उमेदवारांनी कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही, अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक