कृषी विभागाचे विविध पुरस्कार (भाग-3)

 

विशेष लेख क्र.31                                                              दिनांक :- 05 मे 2021


 

महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यात दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेस कृषी विभागामार्फत डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न, वसंतराव नाईक कृषीभूषण, जिजामाता कृषीभूषण, कृषीभूषण (सेंद्रिय शेती), वसंतराव नाईक शेतीमित्र, उद्यानपंडीत पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी व कृषी विभागातील अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात येते. तसेच याच विविध पुरस्कारांच्या धर्तीवर सन-2020 पासून राज्यात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय व नाविण्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या युवा शेतकऱ्यांनाही युवा शेतकरी पुरस्कार देण्यात येणार आहे.

शासनाच्या सन 2020 करिता 1) डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न, 2) वसंतराव नाईक कृषीभूषण 3) जिजामाता कृषीभूषण, 4) सेंद्रीय शेती कृषीभूषण, 5) वसंतराव नाईक शेतीमित्र, 6) युवा शेतकरी, 7) उद्यान पंडीत, 8) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी या पुरस्कारांकरिता शेतकरी निवड व प्रस्ताव सादर करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासनाने जाहीर केल्या आहेत.

            या तीन भागांच्या लेखमालिकेतून विविध कृषी पुरस्कारांचे स्वरुप, दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची संख्या आणि निकष याची माहिती आपल्याला देत आहोत. वाचू या भाग तिसरा…!

 

विविध कृषी पुरस्कारांसाठीच्या विविध स्तरावरील समित्या :-

जिल्हा/विभाग/राज्य/सचिव स्तरावरील समित्या :-

1) डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न, 2) वसंतराव नाईक कृषीभूषण 3) जिजामाता कृषीभूषण, 4) सेंद्रीय शेती कृषीभूषण, 5) वसंतराव नाईक शेतीमित्र, 6) युवा शेतकरी, 7) उद्यान पंडीत, 8) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी या पुरस्कारांसाठीच्या जिल्हा/विभाग/राज्य/सचिव स्तरावरील समित्या पुढीलप्रमाणे आहेत.

जिल्हास्तर समिती :-

  • जिल्हाधिकारी- अध्यक्ष
  • जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी- सदस्य
  •  विस्तार कृषी विद्यावेत्ता/संबंधित विद्यापीठ प्रतिनिधी- सदस्य
  • जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी- सदस्य
  •  प्रकल्प संचालक (आत्मा)- सदस्य
  •  कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद- सदस्य
  •  उपविभागीय कृषी अधिकारी (मुख्यालय)- सदस्य
  •  कृषी पुरस्कार प्राप्त/पीकस्पर्धा विजेता/प्रगतशील शेतकरी यापैकी- एक सदस्य
  • कृषी उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय- सदस्य सचिव

विभागस्तर समिती :-

  • विभागीय कृषी सह संचालक- अध्यक्ष
  •  प्रादेशिक पशुसंवर्धन, सहआयुक्त- सदस्य
  •  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (मुख्यालय)- सदस्य
  •  सहयोगी संशोधन संचालक (संबंधित कृषि विद्यापीठ)- सदस्य
  •  कृषी पुरस्कार प्राप्त / पीकस्पर्धा विजेता/प्रगतशील शेतकरी यापैकी- एक सदस्य
  •  अधीक्षक कृषी अधिकारी (वि.कृ.स.सं.यांचे कार्यालय)- सदस्य सचिव

कृषी आयुक्तालय स्तर समिती :-

  • आयुक्त, कृषी- अध्यक्ष
  • आयुक्त, पशुसंवर्धन- सदस्य
  •  संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद- सदस्य
  •  कृषी संचालक (सर्व)- सदस्य
  •  विभागीय कृषी सहसंचालक (पुणे)- सदस्य
  •  कृषी सहसंचालक (विप्र-2)- सदस्य
  •  कृषी पुरस्कार प्राप्त पीकस्पर्धा विजेता / प्रगतशील शेतकरी यापैकी- एक सदस्य
  •  कृषी उपसंचालक (वि प्र-४)-सदस्य सचिव

सचिव स्तर समिती :-

  • सचिव (कृषी)-अध्यक्ष
  • आयुक्त (कृषी)- सदस्य
  •  विभागीय कृषी सहसंचालक (ठाणे)- सदस्य
  •  संबंधित उपसचिव (कृषी)- सदस्य सचिव

 

 

 

मंत्री स्तरावरील समिती :-

1) डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न, 2) वसंतराव नाईक कृषीभूषण,3) जिजामाता कृषीभूषण, 4) सेंद्रीय शेती कृषीभूषण, 5) वसंतराव नाईक शेतीमित्र, 6) युवा शेतकरी, 7) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी या पुरस्कारांसाठीच्या मंत्री स्तरावरील समिती खालीलप्रमाणे

Ø  मंत्री (कृषी)- अध्यक्ष

Ø  राज्यमंत्री (कृषी)-सदस्य

Ø   सचिव (कृषी)- सदस्य

Ø   आयुक्त (कृषी)- सदस्य

Ø   विभागीय कृषी सहसंचालक (ठाणे)- सदस्य

Ø   संबंधित उपसचिव (कृषी) सदस्य सचिव

उद्यान पंडीत पुरस्कारासाठी मंत्री स्तरावरील समिती :-

Ø  मंत्री (कृषी)- अध्यक्ष

Ø   मंत्री (फलोत्पादन)- सदस्य

Ø   राज्यमंत्री (कृषी)- सदस्य

Ø   राज्यमंत्री (फलोत्पादन)- सदस्य

Ø   सचिव (कृषी)- सदस्य

Ø   आयुक्त (कृषी)- सदस्य

Ø   विभागीय कृषी सहसंचालक (ठाणे)- सदस्य

Ø   संबंधित उपसचिव (कृषी)- सदस्य सचिव

 

विविध कृषी पुरस्कारांचे प्रस्ताव सादर करावयाची कार्यपध्दती :-

ü  जिल्हा / विभाग स्तरावरून प्रादेशीक वर्तमानपत्र, आकाशवाणी आणि दूरदर्शन इ. माध्यमांद्वारे विस्तृत प्रमाणात प्रसिध्दी देऊन खाली दर्शविलेल्या वेळापत्रकाप्रमाणे व निकषानुसार पात्र पुरस्कारार्थ्यांचे जास्तीत जास्त प्रस्ताव तालुका पातळीवरून येतील याबाबत नियोजन करावे.

ü  कृषी विषयक एखादा पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीस पुन्हा नव्याने तोच पुरस्कार किंवा त्यापेक्षा कमी बक्षिस रक्कम असलेल्या पुरस्कारासाठी अर्ज करता येणार नाही.

ü   एखादा कृषी पुरस्कार पती किंवा पत्नीस मिळाला असल्यास पुन्हा त्याच पुरस्कारासाठी त्यांचे पत्नी / पतीस अर्ज करता येणार नाही.

ü  सर्व कृषी पुरस्कारांच्या बाबतीत कृषी किंवा कृषी संलग्न पदविका/पदवीधारक/पदव्युत्तर पदवी / पीएचडी प्राप्त व्यक्ती / शेतकऱ्यास प्राधान्य राहील. पदविका 01 गुण पदवीधारक- 02 गुण पदव्युत्तर पदवी- 03 गुण पीएचडी 04 गुण द्यावयाचे आहेत. गुणांकन/मूल्यांकन केलेल्या गुणांव्यतिरिक्त हे गुण (Grace marks) जास्तीचे असणार आहेत.

ü  शिफारस केलेल्या शेतकऱ्यांची सोबत सहपत्रित केलेल्या विहीत प्रपत्रांत माहिती काळजीपूर्वक व बिनचूक भरावी.

ü   सादर केलेला प्रस्ताव अपूर्ण असेल तर तो प्रस्ताव फेटाळण्यात यावा, तो फेटाळल्यानंतर संबंधित प्रस्तावाच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचे अपील दाखल करून घेतले जाणार नाही, हे सर्व संबंधिताच्या निदर्शनास आणावे.

ü   सादर केलेला प्रस्ताव आणि त्यासोबत जोडलेली कागदपत्रे सदस्य सचिव यांनी साक्षांकित करावे.

ü   जिल्हास्तरीय समितीने प्राप्त प्रस्तावानुसार शेतीची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी.

ü   प्रत्येक पुरस्कारासाठी प्रत्येक जिल्ह्यातून किमान 01 प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे आणि त्याची सर्व जबाबदारी जिल्हास्तरीय समितीची राहील.

ü   गुणांकन केलेल्या प्रस्तावाच्या बाबतीत संपूर्णपणे गोपनीयता राखण्यात यावी. गुणांकनाचा मुद्येनिहाय तपशिल प्रपत्र उ मध्ये प्रत्येक पुरस्काराकरिता प्रस्तावासोबत जोडण्यात यावा.

ü  वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) पुरस्कार वगळून इतर सर्व पुरस्कारांचे बाबतीत विभागातून एकापेक्षा जास्त प्रस्ताव सादर करण्यात येत असेल तर वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव सादर करताना प्राधान्यक्रम देऊन प्रस्ताव सादर करावेत.

ü  वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी (सर्वसाधारण गट) पुरस्काराचे बाबतीत जिल्हास्तरीय समितीने गुणानुक्रमे प्रति जिल्हा पहिले दोन प्रस्ताव विभागस्तरीय समितीकडे सादर करावेत. आणि विभागस्तरावरून प्रति जिल्हा गुणानुक्रमे पहिल्या दोन प्रस्तावाची शिफारस आयुक्तालय स्तरीय समितीकडे करण्यात यावी.

ü  विभागीय कृषी सहसंचालक यांनी, कृषी आयुक्तालयास प्रस्ताव सादर करताना संबंधितांचे दोन पासपोर्ट साईज फोटो (स्टेपल न करता फोटोच्या मागे शेतक-याचे संक्षिप्त नाव व मोबाईल नंबर नमुद करावा) तसेच संबंधितांचे विहित नमुन्यातील प्रपत्रे आणि विभागीयस्तरावरील समितीच्या बैठकीच्या परीपूर्ण इतिवृत्तासह कृषी आयुक्तालयास सादर करावेत. प्रस्तावाची फक्त मूळप्रत कृषी आयुक्तालयास पाठविण्यात यावी व उर्वरीत प्रती जिल्हा व विभाग स्तरावर जतन करुन ठेवाव्यात.

 

 

 

विविध कृषी पुरस्कारांकरीता खालीलप्रमाणे वेळापत्रक विहित करण्यात आले आहे :-

Ø  दरवर्षी माहे एप्रिल मध्ये कृषी आयुक्तालय स्तरावरून वर्तमानपत्रामधून जाहिरात प्रसिध्द करून विविध कृषी पुरस्कारासाठी प्रस्ताव 30 जून पर्यंत सादर करणेबाबत आवाहन करणे.

Ø   जिल्हास्तर समितीने दरवर्षी 31 जुलै पर्यंत अधिनस्त तालुक्यांकडून प्रस्ताव प्राप्त करून घ्यावेत.

Ø   जिल्हास्तर समितीने प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन, समक्ष भेट देऊन समक्ष भेट देऊन अनुषंगिक बाबींची पूर्ततेची कार्यवाही करुन घेवून प्रस्ताव 31 ऑगस्ट पर्यंत विभागस्तरीय समितीकडे सादर करणे.

Ø  विभागस्तरीय समितीने प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन, समक्ष भेट देऊन उल्लेखनीय कार्याबाबतच्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह शिफारस केलेले परिपूर्ण व निकषाप्रमाणे पात्र प्रस्ताव विभागस्तरीय समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तासह कृषी आयुक्तालयास खास दूतामार्फत एकत्रितपणे 30 सप्टेंबर पर्यंत सादर करणे.

Ø  कृषी आयुक्तालयस्तर समितीने विभागस्तर समितीकडून शिफारशीसह प्राप्त झालेल्या पात्र प्रस्तावांची छाननी करुन 30 नोव्हेंबर पर्यंत शिफारशीसह अंतिम निवडीसाठीचा प्रस्ताव शासनास सादर करणे.

विविध कृषी पुरस्कारांकरीता प्रस्ताव सादर करावयाचे प्रपत्र :

विविध कृषी पुरस्कारासाठी तयार केलेली खालीलप्रमाणे प्रपत्रे सहपत्रित करण्यात आली आहेत.

v  प्रपत्र अ (सर्व कृषी पुरस्कारांसाठी) कृषी पुरस्कारासाठी शेतकरी/व्यक्ती/संस्था यांनी करावयाच्या अर्जाचे प्रारूप

v  प्रपत्र ब (सर्व कृषी पुरस्कारांसाठी) पुरस्कारार्थीची सर्वसाधारण माहिती

v  प्रपत्र क (सर्व कृषी पुरस्कारांसाठी) पुरस्कारार्थीची उल्लेखनिय कार्याबाबतची माहिती

v   प्रपत्र ड (सर्व कृषी पुरस्कारांसाठी) परिचय लेख

v  प्रपत्र इ (फक्त वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी (सर्वसाधारण गट/ आदिवासी गट) / युवा शेतकरी पुरस्कारसाठी गुणपत्रक

v  प्रपत्र ई (सर्व कृषी पुरस्कारांसाठी) स्वयं घोषणापत्र

v   प्रपत्र 1 (डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कारासाठी) - मूल्यांकन प्रपत्र

v   प्रपत्र 2 (वसंतराव नाईक कृषीभूषण व जिजामाता कृषीभूषण पुरस्कारासाठी) मूल्यांकन प्रपत्र

v   प्रपत्र 3 (सेंद्रीय शेती कृषीभूषण पुरस्कारासाठी) - मूल्यांकन प्रपत्र

v  प्रपत्र 4 (वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कारासाठी) - मूल्यांकन प्रपत्र

v   प्रपत्र 5 (उद्यान पंडीत पुरस्कारासाठी) मूल्यांकन प्रपत्र

v   प्रपत्र 6 (युवा शेतकरी पुरस्कारासाठी) - मूल्यांकन प्रपत्र

परिचय लेखामध्ये नमूद दस्तऐवज प्रस्तावासोबत जोडणे अनिवार्य आहे. प्रत्यक्ष जोडलेल्या/दस्तऐवज याच्या आधारावरच गुणांकन करण्यात यावे. विहित प्रपत्रामध्येच जिल्हा लेख/कात्रणे स्तरावर अर्ज/प्रस्ताव तयार करुन घेऊन वरिष्ठ स्तरावर सादर करावेत. अपूर्ण प्रस्ताव कृषी आयुक्तालयात स्विकारले जाणार नाहीत.

सर्व कृषी पुरस्कारासाठी प्रत्येक जिल्ह्यातून सुयोग्य शेतकरी/व्यक्ती /गट/ संस्था यांचा प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यावर व संनियंत्रणाची जबाबदारी विभागीय कृषी सहसंचालक यांची राहील.

कृषी सेवारत्न पुरस्कार वगळून इतर सर्व पुरस्कारार्थीना पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरिता देय असलेला दैनिक भत्ता व प्रवास भत्ता याकरीता रक्कम रु.10,000/- विहित पद्धतीने देण्यात यावा.

 सन 2020 साठीच्या विविध कृषी पुरस्कारार्थीच्या निवडीसाठी प्रस्तुत मार्गदर्शक सूचना लागू राहतील.

या योजनांच्या व पुरस्कार प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशीदेखील आपण संपर्क साधू शकता, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी केले आहे.

 

मनोज शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी,

रायगड-अलिबाग

0000000

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड