नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मौजे देवघर हरिहरेश्वर येथील जागा हस्तांतरित

 


 

अलिबाग, जि.रायगड दि.06 (जिमाका) :- श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष घालून संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.

     या पार्श्वभूमीवर मौजे देवघर, ता.श्रीवर्धन येथील गावठाण नं.1/101/अ क्षेत्र 2-24-50 हे.आर.या सरकारी खुले गावठाण वहिवाटदार ग्रुप ग्रामपंचायत हरिहरेश्वर या मिळकतीपैकी 0-22-0 हे.आर.ही जमीन ग्रुप ग्रामपंचायत हरिहरेश्वर (देवघर) यांच्याकडून शासनाकडे पूर्नग्रहण करण्यात आली असून ही जमीन जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र हरिहरेश्वर, ता.श्रीवर्धन करिता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड