जवाहर नवोदय विद्यालयात जी-20 कार्यशाळा संपन्न

 

 

अलिबाग,दि.15 (जिमाका):-जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर, रायगड येथे दि. 14 जून 2023 रोजी एक दिवसीय जी-20 कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमात ग.रा. मेथा हायस्कूल, निजामपूर आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, निजामपूर येथील 20 शिक्षक तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील 40 विद्यार्थी सहभागी झाले होते.

या कार्यक्रमात जवाहर नवोदय विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य के. वाय. इंगळे यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले. G- 20 परिषदेसंदर्भात बोलताना ते म्हणाले, की विकसनशील आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना सामावून घेऊन जगाच्या अर्थव्यवस्थेला स्थिरता देणं हा या गटाचा उद्देश आहे. G20 राष्ट्रगटाचं अध्यक्षपद फिरतं असतं आणि डिसेंबर 2022 पासून ते वर्षभरासाठी भारताकडे आले आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संदर्भात बोलताना त्यांनी हे धोरण विद्यार्थी तसेच शिक्षक या दोघांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असून नजीकच्या काळात या धोरणाला संपूर्ण देशभरात अधिकाधिक सक्रिय पद्धतीने राबविले जाणार आहे असे सांगितले.

यावेळी नवोदय विद्यालयाचे कार्यालय अधीक्षक नितीन बुधगे आणि इंग्रजी भाषा शिक्षिका सौ. सीमा जोशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित शिक्षकांच्या वतीने विद्यालयाप्रती आभार व्यक्त करण्यात आले तसेच अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक