“शासन आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन

  


 

अलिबाग,दि.15 (जिमाका):- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग व लोकनेते दि.बा.पाटील, नवी मुबंई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बेरोजगार उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा  शनिवार दि.24 जून, 2023 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत पनवेल-उरण आगरी समाज मंडळाचे महात्मा फुले सभागृह ता.पनवेल जि. रायगड या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.

त्यासा़ठी या कार्यालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या आस्थापनांनी या विभागाचे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर प्रथम आपल्याकडे हवे असलेले कुशल/अकुशल मनुष्यबळाची माहिती भरावी.  ही माहिती भरताना प्रथम उपरोक्त संकेतस्थळावर Employment - Employer (List a Job)- Employer Login या क्रमाने जाऊन आपल्या आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपल्या आस्थापनेची माहिती पहावी. त्यातील  Pandit Dindayal Upadhyay Job Fair  या ऑप्शनमधून दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील आपल्या जिल्हयाच्या नावावरील View Details - Job Details - Agree and Post Vacancy-Add New Vacancy ऑप्शनवर क्लीक केल्यानंतर रिक्तपदांची माहिती भरुन शेवटच्या पानावरील  Save Vacancy वर क्लीक करावे.

त्याचप्रमाणे ज्या आस्थापनांची यापूर्वी संकेतस्थळावर नोंदणी करण्यात आलेली नाही, त्यांनी https://rojgar.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर Employment-Employer (List a Job)-Register या क्रमाने जाऊन नवीन नोंदणी करावी व आपल्याकडील रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर दि. 23 जून 2023 पर्यंत नोटीफाइड करावीत. नवीन नोंदणी करताना संकेतस्थळावर Employment-Employer (List a Job)-Register या ऑप्शन्सचा वापर करून आपल्या आस्थापनेची नोंदणी करावी. नवीन नोंदणी करताना आपले व्यवसाय सुरु करण्याबाबतचे प्रमाणपत्र (Incorporation Certificate) नोंदणीमध्ये अपलोड करणे आवश्यक आहे. आपल्या आस्थापनेची नवीन नोंदणी केल्यानंतर आपल्याकडील रिक्तपदे अधिसूचित करुन संकेतस्थळावर पुढील कार्यवाही करावी.

संकेतस्थळावर नवीन नोंदणी करणे व पदे अधिसूचित करणे या संदर्भात आपणास काही समस्या असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02141-222029 किंवा श्री. महेश भा.वखरे, लिपिक-टंकलेखक यांचे 9421613757 या दूरध्वनी क्रमांकावर वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीम.अ.मु.पवार यांनी केले आहे.

०००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक