रेवदंडा-साळाव पुलावरील 12 टनावरील अवजड वाहतुकीबाबत बंदी आदेश जारी

 

अलिबाग,दि.15 (जिमाका):- अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार रेवदंडा साळाव पुलावरून होणाऱ्या अतिअवजड वाहतुकीमुळे पूल क्षतीग्रस्त झाल्यास होणारी दूर्घटना टाळण्याच्या दृष्टीने तसेच पुलाची पुर्नबांधणी व दुरुस्तीचे काम करण्याकरिता रेवदंडा-साळाव पुल दि.29 ऑगस्ट 2024 पुलावरून 12 टनावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी जारी केले आहेत.

     त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी अधिसूचनेच्या दिनांकापासून रेवदंडा-साळाव पुलावरील 12 टनावरील अवजड वाहतूक दि.29 ऑगस्ट 2024 रोजीपर्यंत बंद करुन अलिबाग ते साळाव दरम्यान होणारी अवजड वाहनाची वाहतूक ही अलिबाग-पोयनाड-वडखळ-नागोठणे-कोलाड-रोहा-तळेखार-साळाव मार्गे अथवा अलिबाग-पेझारी चेकपोस्ट- नागोठणे - कोलाड- रोहा- तळेखार - साळाव मार्गे तसेच दुसरा पर्यायी मार्ग अलिबाग-बेलकडे-वावे-सुडकोली-रोहा-तळेखार-साळाव मार्गे व मुरुड अलिबाग दरम्यान होणारी अवजड वाहतूक ही मुरुड- साळाव- तळेखार-चणेरा-रोहा-कोलाड - नागोठणे- वडखळ-पोयनाड -अलिबाग अथवा मुरुड - साळाव - तळेखार-रोहा-कोलाड-नागोठणे-पेझारी चेकपोस्ट-अलिबाग तसेच दुसरा मार्ग मुरुड - साळाव- तळेखार-रोहा-सुडकोली-वावे-बेलकडे-अलिबाग या पर्यायी मार्गाचा वापरही करु शकतात, असे कळविले आहे.

   तरी नागरिकांनी येथे नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक