“ स्वेच्छेने रक्तदान करू या” “करोनाविरूद्धच्या लढ्यात हातभार लावू या .!”

 

विशेष लेख क्र.29                                                                                           दिनांक :- 30 सप्टेंबर 2020


             राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस सर्वप्रथम  01 ऑक्टोबर 1975 साली Indian Society Of Blood Transfusion and Immunoheamatology ( इंडियन सोसायटी आँफ ब्लड ट्रान्सफ्यूजन अँड इम्युनोहिमॅटोलॉजी ) व्दारे व्यक्तीच्या जीवनात रक्ताची आवश्यकता आणि रक्ताचे महत्त्व यासाठी साजरा करण्यात आला.  ISBTI(आय.एस बी.टी आय.)ची स्थापना दि.22 ऑक्टोबर 1971 साली डॉ. जे.जी ज्वाली आणि श्रीमती के.स्वरूप यांच्या नेतृत्वाखाली झाली.

            स्वैच्छिक रक्तदानासाठी आवाहन :-

            देशात तसेच महाराष्ट्रात कोविड-19 कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झाल्यामुळे या काळात सर्वात मोठा फटका रक्तपेढ्यांना झाला आहे. रक्ताचा तुटवडा भासू नये तसेच करोनाविषाणूचा  संसर्ग टाळण्यासंबधी शासनातर्फे देण्यात आलेल्या सगळ्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून स्वैच्छिक रक्तदान करण्याचे आवाहन शासनस्तरावरुन करण्यात आले, आपण जर रक्तदान करताना  सोशल डिस्टन्सिंगचा, सॅनिटायझर आणि मास्क इ. यांचा योग्य वापर आणि काळजी घेतली तर रक्तदात्याला कोणताही प्रकारचा धोका नाही.   याबाबतीत शासन स्तरावर मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांचे तसेच शासनस्तरावरूनही स्वैच्छिक रक्तदानासाठी रक्तदात्यांना जनजागृतीपर आवाहन करण्यात आले होते. त्यास जनतेकडून उत्तम प्रतिसादही मिळाला. Let's donate blood voluntarily and contribute to the fight against CORONA.
स्वेच्छेने रक्तदान करू या आणि करोनाविरूद्धच्या लढ्यात हातभार लावू या .!हे या वर्षाचे शासनाचे घोषवाक्य आहे.

            रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी स्वैच्छिक रक्तदान एक समाजपयोगी काम :--

              शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे मनुष्याला अनेक आजारांना सामोरे जावं लागते. एखाद्या अपघातात मनुष्य गंभीर जखमी झाल्यास किंवा गंभीर आजार झाल्यास माणसाच्या शरीरात रक्ताची कमतरता मोठ्या प्रमाणात निर्माण होते. ही कमतरता भरून काढण्यासाठी मनुष्याला आवश्यक त्या रक्तगटाची गरज भासू लागते.  अशा वेळी एका व्यक्तीच्या शरीरातून रक्त काढून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात देण्याने ही कमतरता कमी होऊ शकते. तातडीच्या शस्त्रक्रिया,  थॅलेसिमिया, हिमोफिलिया, अॅनेमिया यासारख्या रुग्णांना नेहमी रक्ताची गरज असते. रक्त हे कुठल्याही कारखान्यात अथवा प्रयोगशाळेत तयार होत नसून ते तयार होते तुमच्या आमच्या मानवी शरीरात, यासाठी सुरक्षित रक्त म्हणून स्वैच्छिक रक्तदान महत्त्वाचे ठरते. रक्ताला कुठल्याही जात, पात, धर्म, पंथ नसतो, असते फक्त माणुसकी.! मानवाचे रक्त हे मानवाला चालत असल्याने गरजू रुग्णांसाठी सतत रक्ताची गरज भासत असते. यासाठी आपण स्वैच्छिक रक्तदान करून त्याचबरोबर समाजाप्रति एक सामाजिक बांधिलकी जोपासून रक्तदानाचे एक महान पवित्र कार्य आपल्या हातून घडू शकते. यासाठी वय वर्षे 18 ते 60 वयोगटातील सदृढ व्यक्तीने तसेच युवा वर्गाने या राष्ट्रीय कार्यक्रमात स्वतः सहभागी व्हावे व स्वैच्छिक रक्तदान मोहिमेत रक्तदान करून रुग्णांचे प्राण वाचविण्याच्या दृष्टीने माणुसकीचे पाऊल उचलावे.

रक्तदानासाठी रक्तदात्याला करोना विषाणू संक्रमणाची भीती :-

            रक्तदान केल्यामुळे किंवा रक्तसंक्रमणामुळे करोना विषाणूचा संसर्ग होत नाही. जर रक्तदात्याने रक्तदान केले नाही तर गरजू रुग्णांना रक्त मिळविण्यासाठी समस्या निर्माण होईल. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन म्हणजेच सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझर, इ.योग्य वापर केल्यास आपल्या मनातील करोना या विषाणूची भीती जावून आपण निर्भयपणे रक्तदान करु शकता. याबाबतीत शासनाकडून तसेच नॅको, राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, राज्य रक्त संक्रमण परिषद, रक्तपेढी इत्यादींच्या माध्यमातून वेळोवेळी जनजागृती केली जाते.

            प्लाझ्मा थेरपी कोविड रुग्णांसाठी वरदान ठरु शकते :-

              करोनावर कोणतेही लस अथवा प्रभावी औषध निघालेली नाही.  प्लाझ्मा थेरपीकडून शास्रज्ञ आणि सरकारच्या मोठ्या अपेक्षा आहे. करोनाच्या काळामध्ये रक्तदान तर महत्त्वाचं आहेच पण त्याबरोबर प्लाझ्मा थेरपीही महत्त्वाची आहे.
करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी करोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तींच्या शरीरातल्या प्लाझ्माचा वापर यामध्ये केला जातो.

  या अँटीबॉडीज आपल्या रक्तातल्या प्लाझ्मामध्ये असतात. कोविडमधून बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या शरीरात करोनाशी लढू शकणाऱ्या अँटीबॉडीज मुबलक असतात. त्या काढून करोनाशी लढणाऱ्या एखाद्या  व्यक्तीच्या शरीरात सोडल्या तर मग त्या  व्यक्तीचं शरीर करोनाशी चांगल्या पद्धतीनं प्रतिकार करू शकतात. यासाठी
बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातून प्लाझ्मा गोळा करताना त्याच्या शरीरातून काढलेल्या रक्तातून (Apherasis) मशीनव्दारे प्लाझ्मा वेगळा केला जातो. भारतासोबतच जगातल्या अनेक देशांमध्ये सध्या प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात येतोय.
  पण प्लाझ्मा दान करण्यासाठी काही मार्गदर्शक सूचनांच्या अटी घालण्यात आल्या आहेत.

करोना व्हायरसची लागण झालेला हा रुग्ण पूर्णपणे बरा झालेला असावा.

करोनासाठीची टेस्ट निगेटिव्ह आल्याच्या 28 दिवसांनंतर त्याला प्लाझ्मा दान करता येऊ शकतो. आणि त्यासाठी त्याच्या रक्तातल्या हिमोग्लोबिनचे प्रमाण 12.5 ग्रॅम %  पेक्षा जास्त असायला पाहिजे.

प्लाझमा दान देणाऱ्या व्यक्तीने तीन महिने परदेश दौरा केलेला नसावा.

त्या व्यक्तीला ताप अथवा श्वसनाशी संबंधित विकार असू नये.इ.

    रक्तदान करतेवेळी रक्तदात्याचे वय ,रक्तदाब, हिमोग्लोबिन, पल्स ऑक्सिमीटर, तापमान आदी चाचण्या करूनच रक्त घेतले जाते.  आज दि. 01 ऑक्टोबर राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिनानिमित्त स्वैच्छिक  रक्तदानाविषयी रक्तदात्यांमध्ये  जनजागृती व्हावी व जास्तीत नागरिकांनी रक्तदान करावे, यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांनी आवाहन केले आहे.

      एवढ्यासाठीच हा लेख प्रपंच…!

 

हेमकांत सोनार,
जिल्हा रुग्णालय रक्तपेढी
अलिबाग-रायगड
9511882578

0000000

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक