कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

 

 

अलिबाग,दि.4(जिमाका):- मा.भारत निवडणूक आयोगाकडील दि.29 डिसेंबर 2022 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकान्वये शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला असून त्याबाबतची आचारसंहिता दि.29 डिसेंबर 2022 ते दि.4 फेब्रुवारी 2023 पर्यंत लागू झाली आहे.

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे- निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्दी करण्याचा दिनांक : गुरुवार, दि.5 जानेवारी 2023, नामनिर्देशन सादर करण्याचा अखेरचा दिनांक : गुरुवार, दि.12 जानेवारी 2023, नामनिर्देशनपत्रांची छाननी: शुक्रवार, दि.13 जानेवारी 2023, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक : सोमवार, दि.16 जानेवारी 2023, मतदानाचा दिनांक व मतदानाची वेळ : सोमवार, दि.30 जानेवारी 2023, सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत, मतमोजणीचा दिनांक : गुरुवार, दि.2 फेब्रुवारी 2023,  निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक : शनिवार, दि.4 फेब्रुवारी 2023.

कोकण विभाग शिक्षक मतदार संघामध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग हे 5 जिल्हे समाविष्ट आहेत. प्रस्तावित मतदार केंद्र, कोकण विभाग शिक्षक मतदार संघातील रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 32 मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आली आहेत.

अलिबाग तालुक्यातील यादी भाग क्रमांक 26/91 मध्ये पुरुष संख्या 187, स्त्री संख्या 252 असे एकूण 439, आवास- यादी भाग क्रमांक 27/91 मध्ये पुरुष संख्या 37, स्त्री संख्या 52 असे एकूण 89, हाशिवरे- यादी भाग क्रमांक 28/91 मध्ये पुरुष संख्या 41, स्त्री संख्या 22 असे एकूण 63,  पेझारी- यादी भाग क्रमांक 29/91 मध्ये पुरुष संख्या 92, स्त्री संख्या 74 असे एकूण 166, रेवदंडा- यादी भाग क्रमांक 30/91 मध्ये पुरुष संख्या 34, स्त्री संख्या 36 असे एकूण 70.

कर्जत तालुक्यात- यादी भाग क्रमांक 31/91 मध्ये पुरुष संख्या 264, स्त्री संख्या 276 असे एकूण 540.

खालापूर तालुक्यात- यादी भाग क्रमांक 32/91 मध्ये पुरुष संख्या 234, स्त्री संख्या 409 असे एकूण 643.

महाड तालुक्यात- यादी भाग क्रमांक 33/91 मध्ये पुरुष संख्या 301, स्त्री संख्या 218 असे एकूण 519.

माणगाव तालुक्यात- यादी भाग क्रमांक 34/91 मध्ये पुरुष संख्या 250, स्त्री संख्या 173 असे एकूण 423, गोरेगाव- यादी भाग क्रमांक 35/91 मध्ये पुरुष संख्या 93, स्त्री संख्या 40 असे एकूण 133.

तळा तालुक्यात- यादी भाग क्रमांक 36/91 मध्ये पुरुष संख्या 73, स्त्री संख्या 17 असे एकूण 90.

म्हसळा तालुक्यात- यादी भाग क्रमांक 37/91 मध्ये पुरुष संख्या 94, स्त्री संख्या 40 असे एकूण 134.

मुरुड तालुक्यात- यादी भाग क्रमांक 38/91 मध्ये पुरुष संख्या 119, स्त्री संख्या 106 असे एकूण 225.

पनवेल तालुक्यात- यादी भाग क्रमांक 39/91 मध्ये पुरुष संख्या 481, स्त्री संख्या 1207 असे एकूण 1688, कळंबोली- यादी भाग क्रमांक 40/91 मध्ये पुरुष संख्या 485, स्त्री संख्या 1180 असे एकूण 1665, पळस्पे- यादी भाग क्रमांक 41/91 मध्ये पुरुष संख्या 90, स्त्री संख्या 119 असे एकूण 209, कर्नाळा+दापिवली- यादी भाग क्रमांक 42/91 मध्ये पुरुष संख्या 45, स्त्री संख्या 49 असे एकूण 94, नेरे+मोरबे- यादी भाग क्रमांक 43/91 मध्ये पुरुष संख्या 51, स्त्री संख्या 76 असे एकूण 127,

ओवळे- यादी भाग क्रमांक 44/91 मध्ये पुरुष संख्या 97, स्त्री संख्या 201 असे एकूण 298, ओवळे- यादी भाग क्रमांक 44/91 मध्ये पुरुष संख्या 97, स्त्री संख्या 201 असे एकूण 298, पोयंजे- यादी भाग क्रमांक 45/91 मध्ये पुरुष संख्या 4, स्त्री संख्या 4 असे एकूण 8, तळोजे- यादी भाग क्रमांक 46/91 मध्ये पुरुष संख्या 63, स्त्री संख्या 106 असे एकूण 169.

पेण तालुक्यात- यादी भाग क्रमांक 47/91 मध्ये पुरुष संख्या 292, स्त्री संख्या 304 असे एकूण 596.

पोलादपूर तालुक्यात- यादी भाग क्रमांक 48/91 मध्ये पुरुष संख्या 111, स्त्री संख्या 54 असे एकूण 165.

रोहा तालुक्यात- यादी भाग क्रमांक 49/91 मध्ये पुरुष संख्या 136, स्त्री संख्या 121 असे एकूण 257, नागोठणे- यादी भाग क्रमांक 50/91 मध्ये पुरुष संख्या 204, स्त्री संख्या 191 असे एकूण 395.

सुधागड तालुक्यात- यादी भाग क्रमांक 51/91 मध्ये पुरुष संख्या 114, स्त्री संख्या 74 असे एकूण 188.

श्रीवर्धन तालुक्यात- यादी भाग क्रमांक 52/91 मध्ये पुरुष संख्या 64, स्त्री संख्या 66 असे एकूण 130, बोर्ली पंचतन- यादी भाग क्रमांक 53/91 मध्ये पुरुष संख्या 77, स्त्री संख्या 45 असे एकूण 122.

उरण तालुक्यात- यादी भाग क्रमांक 54/91 मध्ये पुरुष संख्या 106, स्त्री संख्या 182 असे एकूण 288, चिरनेर- यादी भाग क्रमांक 55/91 मध्ये पुरुष संख्या 73, स्त्री संख्या 79 असे एकूण 152. अशी एकूण पुरुष संख्या 4 हजार 312 तर स्त्री संख्या 5 हजार 773 असे एकूण 10 हजार 85.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक